जिला

नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी, व पोलीस अंमलदार सेवानिवृत्त…

नांदेड पोलीस दलातील एक पोलीस उप-निरीक्षक, दोन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस अंमलदार यांचा नियत वयोमानानुसार दिनांक 31.01.2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे हस्ते आज दिनांक 31/01/2024 रोजी गुन्हे बैठक सुरू होण्यापुर्वी सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगीरी करणारे संबधीत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम मंथन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे पार पडला.
सर्व सेवानिवृतांनी आता आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे व सुखी समाधानाने आनंदी जिवन जगन्याचा सल्ला दिला. सदर सेवानिवृत्त समारंभास. मा. श्री आबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री.खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्रीमती डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप-अधिक्षक (मु), जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोस्टे स्वाधीन अधिकारी नांदेड जिल्हा मा. श्री नामदेव रिठठे, पोलीस निरीक्षक कल्याण श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी मपोउपनि माया भोसले, पोलीस कल्याण विभाग नांदेड, इतर अधिकारी व अंमलदार मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोउपनि श्री विठ्ठल कत्ते यांनी केले असुन, मपोकों राखी कसबे, पोलीस कल्याण यांनी कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले.
सेविनिवृत्त अंमलदाराचे नाव – काशिनाथ मारोतराव बोरकर, जसवंतसिंध हुजुरसिंध शाहु, सुर्यकांत श्रीराम गुटटे, राजाराम चंदरराव मिरदोड

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button