जिला

ओला आणि सुका कच-यांचे योग्‍य प्रकारे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती

अभियान कालावधी: 8 जुलै ते 7 ऑगस्‍ट 2024
स्वच्छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा जागृतीसाठी गृहभेटी

नांदेड,6- आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात सोमवार दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्‍ट 2024 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍याचे निर्देश राज्‍य शासनाने दिले आहेत. त्‍यानुसार जिल्‍हयातील प्रत्‍येक गावात स्‍वच्‍छतेचे दाने रंग- ओला हिरवा, सुका निळा या नावाने अभियान राबविण्यात येणार आहे.

 

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रत्‍येक गावात 5 संवादकाची निवड करण्‍यात येणार असून हे संवादक प्रत्‍येकाच्‍या घरी जावून संदेश देणार आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे.

 

ओला हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा. तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्‍यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापर आदि बाबत गृहभेटीतून माहिती देण्‍यात येणार आहे. भेटी दरम्यान शासनाच्‍या गुगललींकव्‍दारे त्या कुटुंबाची फोटोसह माहिती भरण्‍यात येणार आहे.
तरी गट विकास अधिकारी यांनी आपल्‍या तालुक्‍यातील गावांचे प्रती कुटूंब पाच या प्रमाणे संवादक तयार करुन गृहभेटीचे आयोजन करावे. या कामी तालुक्‍यातील सर्व अधिकारी, विस्‍तार अधिकारी यांनी संनियंत्रण करुन अंमलबजावधी करावी. दर आठवडयाला या अभियानाचा जिल्‍हास्‍तरावरुन आढावा घेण्‍यात येईल.

 

तसेच दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्‍ट दरम्‍यान राबविण्‍यात येणा-या ओला व सुका कचरा व्‍यवस्‍थापनासाठी ग्रामस्‍थानी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहनही जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्राम पंचायत विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे तसेच जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button