मतदार यादीतील नाव दुरुस्ती आणि नवीन नावे नोंदणी करून घ्या- म. मुबशिर
धर्माबाद:-6-24आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात आले असेल किंवा १ जुलै २०२४ ला आपले वय १८ वर्ष पूर्ण होत असेल तर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २५ जून ते २४ जुलै ह्या काळात नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू झालेला असून आजच आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्या व नसल्यास नोंदणी करून घ्यावीत ज्यांची वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत अशा सर्व युवक युवतींना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे असे आव्हान पत्रकार संरक्षण समिती तालुका अध्यक्ष म. मुबशिर यांनी केले आहे.भारतीय लोकशाहीत मतदान हे सर्वश्रेष्ठ अधिकार आहे.
ज्याचा वापर आपण आपला लोकप्रतिनिधीं निवडून देण्यासाठी करतो जेणे करून आपल्या शहराच्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा नवनवीन योजना आमलात याव्यात आणि उद्योग व्यवसायाचे प्रकल्प आपल्या शहरात गावात यावेत मतदान हे लोकशाहीने दिलेले प्रबळ शस्त्र आहे. त्यामुळे विधान सभा निवडणुका जवळ आल्या आहेत या निवडणूकीत आपण सर्वाँना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा व भारतीय लोकशाहीचा उत्सवात सहभागी होता.
यावे यासाठी नायगांव विधानसभा मतदार संघातील सर्वच नागरिकांना आपल्या मतदार यादीत नाव दुरुस्ती आणि नवीन मतदार नोंदणीत सहभागी होऊन ज्यांची नावे नाहीत अश्यानी आपली नावे मतदार यादीत नोंदणी करून घ्यावीत यासाठी आपल्या प्रभागातील बी.एल ओ.संपर्क साधावा किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्र वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आव्हान पत्रकार संरक्षण समिती चे तालुका अध्यक्ष म. मुबशिर यांनी केले आहे.