शिक्षण

तयारीला लागा! रजिस्ट्रेशन्सही झाले सुरु; UGC NET 2023 परीक्षेच्या तारखांची घोषणा; असा करा अभ्यास

मुंबई, 31 डिसेंबर: UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे.डिसेंबर रोजी, यूजीसी नेट परीक्षेची डिसेंबर 2022 सायकलची तारीख जाहीर करण्यात आली.
त्यानुसार परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. आणि डिसेंबर सायकल परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाईल. आता यूजीसीने नेट परीक्षेच्या जून २०२३ च्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी ट्विट केले की, यूजीसी नेट जून 2023 सायकलची परीक्षा 13 ते 22 जून दरम्यान घेतली जाईल.
UGC चेअरमनने लिहिले की, ‘UGC NET जून 2023 सायकलसाठी तारखांची घोषणा: UGC NET चे आयोजन राष्ट्रीय चाचणी एजन्सी, NTA द्वारे वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये केले जाते. उमेदवारांना सूचित केले जाते की UGC NET जून 2023, पहिली सायकल परीक्षा 13 जून ते 22 जून दरम्यान घेतली जाईल. UGC NET डिसेंबर 2022 सत्रासाठी नोंदणी देखील सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

असा करा अभ्यासमागील प्रश्नपत्रिका बघा जर तुम्ही UGC NET 2021 च्या परीक्षेला बसणार असाल तर परीक्षेच्या तयारीसाठी, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे लक्षात ठेवा जेणेकरुन त्यांना कोणत्या विषयातून प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्नांच्या प्रकाराची कल्पना येईल. तसेच कोणते प्रश्न परत परत विचारले जातात याचीही कल्पना येईल.

मॉक टेस्टवर लक्ष केंद्रित करा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही नियमित मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे. मॉक टेस्टचा प्राथमिक उद्देश उमेदवारांना परीक्षेच्या पॅटर्नची कल्पना मिळावी, एवढेच नाही तर उमेदवारांना UGC NET मॉक टेस्ट देताना वेळ मर्यादेचे पालन करून टाइम मॅनेजमेंटचा सराव करता येईल.
महत्त्वाच्या विषयांची यादी बनवा UGC-NET इच्छुक व्यक्तीने महत्त्वाच्या विषयांची यादी बनवून त्या विषयांतील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे. त्यामुळे त्यांना परीक्षेची तयारी वेगाने करण्यास मदत होईल. महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास आधी केला तर परीक्षा पास करण्यात मदत होऊ शकते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button