जिला

नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक व पोलीस अंमलदार सेवानिवृत्त ….

नांदेड पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एक कार्यालयीन अधिक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक दोन सपोउपनि व तीन पोलीस अंमलदार यांचा नियत वयोमानानुसार दिनांक 31.12.2022 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, दिनेश सोनकर, सपोनि नियंत्रण कक्ष अधिकारी यांचे हस्ते आज दिनांक 31/12/2022 रोजी सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला. सदर सेवानिवृत्त समारंभ मंथन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे पार पडला. सर्व सेवानिवृतांनी आता आपल्या कुटूंबाकडे लक्ष द्यावे व सुखी समाधानाने आनंदी जिवन जगन्याचा सल्ला दिला. सदर सेवानिवृत्त समारंभास मसपोनि कमल शिंदे, पोलीस कल्याण विभाग नांदेड, ईतर शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोउपनि श्री विठ्ठल कत्ते यांनी केले असुन, मपोकों राखी कसबे, पोलीस कल्याण यांनी कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले.
पोलीस निरीक्षक भगवान दत्तात्रय कापकर
पोउपनि प्रकाश माधवराव सांगळे

पोउपनि विश्वनाथ रामराव केंद्रे
पोउपनि मोहम्मद मौलाना सय्यद
पोउपनि घनश्याम उत्तम चव्हाण
सपोउपनि नारायण वामन सुर्यवंशी
सपोउपनि चंद्रकांत सुर्यभान जाधव
एकनाथ गेंदुजी देवके
शेख मुबारक शेख मेहबुबसाहाब
राशिदखान मुर्तजाखान पठाण 
शामराव रामराव सुर्यतळ

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button