क्राईम
देगलूर पोलीसाची कामगीरी घरफोडीचे गुन्ह्यातील सराईत चोरट्यास अटक
मागील काही दिवसापासुन देगलुर शहरात रात्रीचे वेळी घरफोडीचे सत्र चालू होते. शहरातील शारदा नगर येथे राहणारे दिनेश संगमनाथ मुनगीलवार, व्यवसाय गुत्तेदार हे मुलाला भेटण्यासाठी पुणे येथे गेले असता दिनांक 01/12/2022 ते 06/12/2022 रोजी चे दरम्यान त्याचे बंद घराचा चोरट्यांनी कडी कोडा तोडून घरातील सोनी कंपनीची टि.व्ही., भारत कंपनीची गॅस सीलेंडर, कारवान कंपनीचे गाण्याचे टेप रेकॉर्डर, शालू, लेनीन कंपनीचे ड्रेस कापड, लक्ष्मीपुजनासाठी ठेवलेले चांदीचे नाणे, एक सोन्याची नथ, साडया, मिलटन कंपनीची पाणी बॉटल, मिलटन कंपनीचे वॉटर हीटर, चॉकलेटी रंगाची दोन बेडसीट, एक तांब्याची कळश, रेमंड कंपनीचे सफारी सुट कापड, चांदीचे चैन, चांदीचे वाळे, चांदीचे शिक्के, सोन्याचे पाटली जोड, सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल, NAVIFORCE कंपनीची हाताची घड्याळ इत्यादी साहीत्य चोरून नेले होते. त्यावरुन पो.स्टे. देगलुर येथे गु.र.न. 540/2022 कलम 454, 457, 380 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता.
तसेच आनंद नगर भायेगाव रोड देगलुर येथे राहणारे हाणमंत खंडु गायकवाड हे त्यांचे आईची तब्येत ठिक नसल्याने दिनांक 12/12/2022 रोजी गावी मंडगी येथे गेले असतांना मध्यरात्री त्यांचे बंद घराचा कोंडा तोडुन घरातील सोन्याचे गंठन, सोन्याचे कानातील झुमके फुल, सोन्याचे मनिमंगळ सुत्र, चांदीचे पायातील वाळे, LG कंपनीचे 32 इंची LED टि.व्ही. असा 2,29,000/- रुपयाचा माल तसेच तेथे शेजारी टेकाळे गल्ली देगलुर येथे राहणारे दत्ता मारोती हाके हे गावी उच्चा येथे असतांना चोरट्याने त्याचे घराचा कोंडा तोडुन घरातील सोन्याचे गळ्यातील पान, रेडमी कंपनीची 32 इंची LED टि.व्ही. असा माल चोरुन नेला होता त्यावरुन हाणमंत खंडु गायकवाड याचे तक्रारीवरुन गु.र.न. 549/2022 कलम 454, 457, 380 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता..
तसेच दिनांक 22/12/2022 साईनगर देगलूर येथे राहणारे राम हाणमंतराव पाटील हे वेळ अमावस्याचे कार्यक्रमासाठी गावी एकलारा येथे गेले असतांना मध्यरात्री चोरट्याने बंद घराचा कोंडा तोडुन घरातील सोन्याचे पाटल्या, सोन्याचेलॉकेट, सोन्याचे गंठन, सोन्याचे आंगठ्या असा 4,65,000/- रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला होता. तसेच शेजारीच आनंदनगर भायेगाव रोड येथे राहणारे बालाजी संप्रतराव एकलारे हे गावी गेले असतांना त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे टॉप्स व वेल, सोन्याची आंगठी, चांदीचे पायातील चैन असा 1,34,000/- रुपयाचा ऐवज चोरुन नेला होता. त्यावरुन राम हानमंतराव पाटील यांनी दिलेलया तक्रारीवरुन गु.र.न.555/2022 कलम 454, 457, 380 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होता..
सदर चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे व आरोपी निष्पन्न करण्याचे दृष्टीने श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब पोलीस अधिक्षक नांदेड, श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड व श्री सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देगलूर यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. सोहन माछरे यांनी सपोनि माळाळे, पो.उप.नि. श्रीकांत मोरे, पो.उप.नि. पुनम सुर्यवंशी, पो.ना. कृष्णा तलवारे, पो. कॉ. सुधाकर मलदोडे, पो. कॉ. संजय यमलवाड, पो. कॉ. नामदेव मोरे, ड्रायव्हर पोहेकॉ. शेख जावेद, पो.कॉ. महाजन, पो.कॉ. बेग यांचे पथक तयार करुन तसेच रात्रगस्त कामी असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोपी निष्पन्न करण्याचे दृष्टीने नियमीतपणे सुचना दिल्या. तसेच पथकातील अधिकारी व अंमलदार यांना शहरात नविन राहण्यास कोण आलेले आहे याबाबत गोपनिय माहीतीगार यांचेकडुन माहीती घेणे बाबत सूचना दिल्या होत्या. पथकातील अधिकारी व अंमलदार यांना राजु बसवे रा. मुकुंदनगर हा सदर भागात राहण्यास आला असून त्याचेघरी चोरीचे साहीत्य असल्याची माहीती समजली.
तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल बाबत सायबल सेलची मदत घेऊन आरोपी नामे राजु गंगाराम बसवे वय 39 वर्ष, रा. मुकुंदनगर देगलुर या आरोपीस ताब्यात घेतले. सदर आरोपीची मुकुंदनगर येथील घराची घरझडती घेतली असता त्याचे ताब्यात सोनी कंपनीची टी.व्ही., भारत कंपनीची गॅस सीलेंडर, कारवान कंपनीचे गाण्याचे टेप रेकॉर्डर, दोन हिरव्या रंगाचे शालु व एक औरेज रंगाचा शालु, साडया, मिलटन कंपनीची पाणी बॉटल, प्रेस्टीज कंपनीचे वॉटर हीटर, चॉकलेटी रंगाची दोन बेडसीट एक तांब्याची कळश, रेमंड कंपनीचे सफारी सुट, सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल, LG कंपनीची led टि.व्ही, चांदीचे बाळे, सोन्याची लॉकेट, चांदीचे चैन असा एकुन 105,500/- रुपयाचा माल मिळुन आला. सदर आरोपीकडुन नमुद गुन्ह्यासह इतर पोलीस ठाणे हृदितील चोरीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असून त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने गुन्ह्याचे तपास कामी दिनांक 02/01/2023 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पो.नि. सोहन माछरे साहेब हे करीत आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन त्याचेकडुन चोरीस गेला माल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगीरी केल्याने श्रीकृष्ण कोकाटे साहेब पोलीस अधिक्षक नांदेड, श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड व श्री सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी. उपविभाग देगलूर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.