लोहा येथील पेट्रोलपंपाचे पैसे घेवुन जाणाऱ्या इसमास लुटलेले चार आरोपी जेरबंद
दिनांक 09/01/2024 रोजी रात्री 20.10 वाजता भिमाशंकर पेट्रोलपंप लोहा येथील इसम हा पंपाचे पैसे घेवुन लोहा येथे जात असतांना त्यांचे मोटार सायकलला लाथ मारुन मो.सा. खाली पाडुन इसमास तलवारीने धाक दाखवुन त्याचे जवळील 4,91,000/-नगदी रुपये जबरीने चोरुन नेल्याची घटना घडली त्यावरुन पो.स्टे. लोहा येथे गुरन 05/2024 कलम 392,34, भादवी व सहकमल 4/25 भाहका प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाच्या संमातर तपासाचे आदेश मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांना दिले होते. त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध करण्यासाठी सपोनि माने यांची एक टिम नेमण्यात आली होती.
श्री पांडुरंग माने सपोनि स्थागुशा यांचे टिम ने गुन्हा घडल्यापासुन सतत लोहा परीसरात तपास व आरोपीचा शोधघेत असताना सपोनि पांडुरंग माने यांना गोपनीय माहीती मिळाली की, पेट्रोल पंपावर काम करणारा इसम नामे 1. पृर्थीराज राजुसिंह ठाकुर वय 20 वर्षे व्यवसाय मजुरी रा. पाटील गल्ली लोहा ता. लोहा याचे माहीती वरुन सदरचा गुन्हा घडला आहे असी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदर इमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, इसम नामे प्रताप पि.बालाजी लाड रा. सायाळ रोड लोहा याने तु आम्हास पंपाचे पैसे कोन घेवुन जाते या बाबत माहीती दे तुला आम्ही 70,000/- हजार रुपये देतो असे आमीश दाखविली त्यावरुन पृर्थीराज राजुसिंह ठाकुर यांनी दिनांक 09/01/2024 रोजी पंपाचे पैसे घेवुन निघाल्यानंतर प्रताप बालाजी लाड यास माहीती दिली त्यावरुन फिर्यादीस दिनांक 09/01/2024 रोजी रात्री 20.10 वाजताचे सुमारास रेस्टहाऊस लोहा समोर आरोपी नामे 2. प्रताप पि. बालाजी लाड वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी रा. सायाळ रोड लोहा ता.लोहा जि. नांदेड, 3. विशाल पि. सुरेख जाधव वय 22 वर्षे व्यवसाय मजुरी रा. राममंदीर माळाच्या पाटाला लोहा ता.लोहा जि. नांदेड, 4. निखील पि.मनोहर टेकाळे वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी रा. मैहसुरखान हवेली जवळ चौफाळा नांदेड ता.जि. नांदेड यांनी मिळुन फिर्यादीस लुटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरुन सदर आरोपीस शोध करुन आरोपींना ताब्यात घेवुन आरोपी नामे प्रताप पि. बालाजी लाड याचे कडुन 1,00,000/- रुपये, विशाल पि. सुरेख जाधव याचे कडुन 50,000/- रुपये व निखील पि. मनोहर टेकाळे याचे कडुन 50,000/- रुपये जप्त असे तिघांकडुन एकुण 2,00,000/- रुपये जप्त करण्यात आले आहेत. चारही आरोपीस पो.स्टे. लोहा गुरन 05/2024 कलम 392,34, भादवी व सहकमल 4/25 भाहकाचे तपास कामी पो.स्टे. लोहा येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि श्री गजानन दळवी, पोलीस अमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, मारोती मोरे, गजानन बयनवाड, विठ्ठल शेळके, राजु सिटीकर, दिपक ओढणे व चालक अर्जुन शिंदे, मारोती मुंडे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.