रत्नाळी येथील अवैधरित्या चालू असलेले रसायनयुक्त शिंदिचे दुकान त्वरीत बंद करण्यात यावे-अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा!▪️
धर्माबाद:- (म. मुबशिर) धर्माबाद शहरालगतच असलेले मौजे रत्नाळी येथे गेल्या दोन वर्षापासून अवैधरित्या रासायनयुक्त शिंदीचे(भट्टी) बंद करण्यात यावे यासाठी विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे तक्रार करण्यात आली सविस्तर वृत्त असे की धर्माबाद तालुक्यात एकही शिंदीचे झाडं नसतांना रसायन मिश्रित शिंदी राजरोसपणे विक्री करत असून प्रशासनाचे भय राहिले नाही देगलूर तालुक्यातील शहापूर येथील एक शिंदी भट्टी चालकाने- धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी येथे दुकान स्थलांतर करुन बेकायदेशीर रासायनिक शिंदीची भट्टी थाटली गेल्या दोन वर्षापासून बेकायदेशीर रासायनिक शिंदीच्या भट्टीचे दुकान थाटले असून, सतत रसायनयुक्त शिंदी पिल्याने आरोग्यावर परिणाम होऊन वर्षभरात दहा माणसे दगावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा रसायन मिश्रित शिंदीला संबंधित प्रशासनाने परवानगी दिली कशी ? असा प्रश्न निर्माण होतानाच पोलिस प्रशासनाने हे आमचे काम नसून ते उत्पादन शुल्काचे असल्याचे सांगत वारंवार टाळाटाळ सुरू केली आहे. रासायनिक नशा करणाऱ्या गोळ्या, रासायनिक मिश्रित शिंदी तयार केली जात आहे.
त्यामुळे गल्ली बोळीत रासायनिक शिंदीची दुकाने थाटली जात आहेत. रासायनिक शिंदीने युवक, महिला, पुरुष, शेतकरी, शेतमजूर व हमाल व्यसनाधिन बनत आहेत. व्यसनी माणसाला शिंदी पिल्याशिवाय जमत नाही बालके सुध्दा शिंदीच्या आहारी जात आहेत. शिंदी अधिक पिल्याने रस्त्यावर शिंदी पिणारे लोळतात. पंधरा ते वीस रुपयांना एक बॉटल भट्टीतून विक्री केली जाते. संसार उद्धवस्त होत आहेत. पण, येथील संबंधित प्रशासनाच्या नजरेला हे पडत नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिंदीमुळे हाडे ठिसूळ होणे, गुडघे दुखणे, वयोमर्यादा घटणे, पोट फुगणे, सुस्त राहणे व हाताला मुंग्या येणे, अंग थरथर करणे आदी आजाराला लोक दिवसेंदिवस बळी पडत आहे मोठे रोग म्हणजे यकृतावर सुज येणे व किडनी खराब होणे याचे मोठे लक्षण आहेत गेल्या दोन वर्षापासून रासायनिक शिंदीचे अति सेवन करून युवक वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे व त्यांचे उज्वल भविष्य अंधाराकडे जात आहे.
कमी दराची रासायनिक शिंदी असल्यामुळे त्यांना सोप्या मार्गाने ती रतनाळी शिंदी भट्टीवर उपलब्ध होते ते खरेदी करून खुल्या मैदानात व झाडा झुडुपांमध्ये बसून रासायनिक शिंदी प्राशन केल्यावर ते त्यांचा घरी जावून त्यांच्या आईवडिलांना भांडणं करणे, अश्लील शिवीगाळ करणे व धिंगाणा घालणे असे उद्रेक शहरात अनेक घटना पाहावायला मिळत आहे.आपल्या पाल्याना अति नशेच्या अवस्थेत पाहून त्या रासायनिक शिंदी भट्टीच्या मालकावर संताप व्यक्त करत आहे त्यांना येथील दुकान तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणीसुद्धा पालक वर्गातून होत आहे. तसेच रासायनिक शिंदी पार्सल साठी कॅरीबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात घरी नेण्यासाठी करित आहे त्यामुळे परिसरातील पर्यावरण दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे केंद्र सरकारने प्लास्टिक वर बंदी घातलेली असून परंतु धर्माबाद शहरात खुल्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर पाहवयास मिळत आहे मुख्यधिकारी नगर परिषद धर्माबाद यांना अनेक वेळा तक्रार करूनही कार्यवाही मात्र शून्य असून यावर अंकूश लावणे गरजेचे आहे असे पर्यावरण प्रेमी मत व्यक्त करत आहे.
सदरील रसायनयुक्त शिंदीची दुकान (भट्टी) तात्काळ धाड मारून बंद करण्यात यावे यासाठी उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना रीतसर तक्रार करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात रसायनयुक्त भट्टी बंद झाली नसल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष म. मुबशिर व सा.कामगार वार्ता प्रतिनिधी अरुण सोनटक्के यांनी दिला आहे.
मागील वर्षापासून धर्माबाद शहरात रत्नाली,बाळापूर व शहरात रसायनयुक्त शिंदीचे सेवन करून जवळपास दिडशे ते दोनशे लोकांनी आपला जीव गमावला आहे.यात जास्त करुन गोर गरीब कष्टाची परिश्रम करणाऱ्याची संख्या जास्त असुन कुटुंबीयांनी घाबरून त्याची पोलिसात नोंद न करता अंत्यविधी केल्यामुळे शासन दरबारी नोंद नाही.याची कसून C.B.I चौकशी केल्यास महारष्ट्ररात सर्वात जास्त शेतकरी, शेतमजूर, हमाल व तरुण पिढी रसायन शेंदीची सेवन करून मरण पावल्यांचे धर्माबाद तालुका म्हणुन घोषित होईल.रत्नाळी येथील रसायनयुक्त शेंदीचे दुकान (भट्टी) तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.