यात्रेत बालकल्याण विभागाच्या विविध स्पर्धा; बक्षिसाचे वितरण
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, मीडिया सेंटर ,13- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माळेगाव यात्रेनिमित्त महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मेहंदी स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, पाक कृती स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये 0 ते 3 वर्षे तसेच 3 वर्ष ते 6 वर्षे वयोगटातील प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या मुलांना दोन पारितोषिक देण्यात आली. त्यात तीन चाकी व दोन चाकी सायकलचा समावेश आहे.
मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या महिलांना प्रत्येकी ट्रॉलीबॅक देण्यात आली. यात्रेत दररोज पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या महिलांना पर्स पारितोषिक देण्यात येत आहे.
सुदृढ बालक स्पर्धा वयोगट 3 ते 6 वर्ष – विजेते प्रथम चेतन गजानन पांडागळे, शिराढोण तालुका कंधार, द्वितीय विराज वेदांत राठोड गाव -आमरुतांडा
सुदृढ बालक स्पर्धा वयोगट 0 ते 3 वर्ष- प्रथम आयुष संदीप हाबगुंडे, रिसनगाव तालुका लोहा, द्वितीय नयन शिवाजी जाकापुरे, वाळकेवाडी तालुका लोहा
मेहंदी स्पर्धा- प्रथम रुपाली दत्ता देवकते, कोष्ठवाडी, द्वितीय पुरस्कार श्रावणी नारायण ठाकुर,उमरगा तृतीय क्रमांक
प्रतीक्षा व्यंकटराव, कोष्ठवाडी यांनी पटकावला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात महिला व बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. या विभागाच्या वतीने माळेगाव यात्रेत भव्य स्टॉलही उभारण्यात आला आहे. या ठिकाणी दररोज पोषण आहार, पाककृती आदीबाबत भाविकांना माहिती दिली जात आहे. यासाठी लोहा व कंधार तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका परिश्रम घेत आहेत.