देश विदेश

मॅगी खाल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू, आईच्या पदरी आयुष्यभराचा पश्चाताप

रीवा. मध्य प्रदेशा : एका मुलीने मॅगी नूडल्स खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि काहीच वेळात तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथे ही घटना घडली. मुलीची तब्येत बिघडल्यानंतर तिला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखविण्यात आले होते. तिथल्या डॉक्टरांनी तिला रीवा येथे नेण्यास सांगितले. कुटुंबीय मुलीला रीवा येथे नोणार त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही मुलगी नववीची विद्यार्थिनी होती.

ट्यूशनवरून घरी परतल्यावर तिने मॅगी खाल्ली होती. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कागदोपत्री कारवाई करुन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हे प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मुलीच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. पण, या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

रेवा जिल्ह्यातील सेमरिया पोलिस स्टेशन हद्दीतील जरमाई गावात ही हृदयद्रावक घटना घडली. कुटुंबीयांनी सांगितले की, रिया साहू ही इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी ७ जानेवारीला संध्याकाळी शिकवणी संपवून घरी परतली. तिला भूक लागली म्हणून तिने आईसोबत मॅगी बनवली. रियाने मॅगी खाल्ल्यानंतर तिची तब्येत खराब झाली. तिची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने सेमरिया सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला रीवा येथे नेण्यास सांगितले. कुटुंबीय रियाला रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात नेत होते. मात्र, येथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

मुलीच्या सांगण्यावरून आईने मॅगी बनवली

कुटुंबीयांनी सांगितले की, रियाला मॅगी खूप आवडायची. घरी येऊन तिने आईला मॅगी खायची असल्याचे सांगितले. पण, तिच्या आईने सांगितले की, घरी जेवण तयार आहे, त्यामुळे तिने जेवण करावे. पण, रियाने आईच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत मॅगी खाण्याचा हट्ट धरला. तिच्या सांगण्यावरून आई आणि मुलीने सोबत मिळून मॅगी बनवली. यानंतर रियाने मॅगी खाल्ली आणि तिची प्रकृती बिघडली.

दुसरीकडे, पोलिसांनाही रियाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईक आणि इतर कुटुंबीयांचे जबाब घेतले. कागदोपत्री आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रत्येक बाजूने चौकशी केली जाईल. कदाचित मॅगी एक्सपायरी डेटची असावी असाही संशय पोलिसांना आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button