देश विदेश

Aadhaar अ‍ॅप मध्ये जोडा कुटुंबातील सदस्यांचे आधार प्रोफाईल; अत्यंत सोपी आहे प्रॉसेस, आत्ताच करून घ्या काम

तुम्हाला माहित आहे का कुटुंबातील सर्व सदस्य तुम्ही तुमच्या mAadhaar अ‍ॅप मध्ये जोडू शकता. ह्याची प्रॉसेस अत्यंत सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला परिवारातील इतर लोकांची माहिती सहज अ‍ॅक्सेस करता येते. तसेच सतत इतर लोकांचं आधार कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. एकच एकाच व्यक्तीच्या mAadhaar अ‍ॅपमध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती राहू शकते.

नियम आणि अटी काय आहेत

mAadhaar च्या माध्यमातून कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार प्रोफाईल लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर्ड मेंबर तुमच्या मोबाइल फोननं आधारला लिंक करावा लागेल. तसेच त्या फॅमिली मेंबरचा आधार मोबाइल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.

अशी आहे संपूर्ण प्रॉसेस

  • सर्वप्रथम mAadhaar अ‍ॅप ओपन करा.
  • फिर “Add Profile” सेलेक्ट करा. हा ऑप्शन एका वेगळ्या टॅबमध्ये दिसू शकतो. ह्याची जागा तुमच्या अ‍ॅप व्हर्जनवर अवलंबुन असू शकते.
  • त्यानंतर तुमच्या फॅमिली मेंबरचा आधार कार्ड नंबर नोंदवा.
  • त्यानंतर माहिती व्हेरिफाय करा आणि टर्म अँड कंडीशन अ‍ॅक्सेप्ट करा.
  • त्यांनतर तुमच्या फॅमिली मेंबरच्या आधारसाठी एक ओटीपी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल, जो तुमच्याशी त्यांना शेयर करावा लागेल.
  • त्यानंतर अ‍ॅपमध्ये ओटीपी सबमिट करा.
  • एकदा का फॅमिली मेंबरचं आधार व्हेरिफिकेशन यशस्वी झालं की नंतर त्यांचं प्रोफाईल तुमच्या mAadhaar अ‍ॅप मध्ये दिसू लागेल.

ह्या गोष्टींची काळजी घ्या

  • तुम्ही तुमच्या mAadhaar अ‍ॅप मध्ये कुटुंबातील जास्तीत जास्त ५ सदस्यांचे प्रोफाईल तुमच्या प्रोफाइलशी जोडू शकता.
  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड रजिस्टर्ड मोबाइल नंबरशी लिंक असावे.
  • तुम्ही फक्त त्या सदस्यांचे प्रोफाईल लिंक करू शकता ज्यांचे मोबाइल नंबर तुमच्या आधारशी लिंक आहेत.
  • एकदा केल्यावर तुम्ही आधारचे फीचर्स सहज वापरू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आधारची माहिती सहज मिळवू शकता, ई-केवायसी डाउनलोड करू शकता, आधार लॉक आणि अनलॉक करू शकता. हे mAadhaar अ‍ॅप मध्ये कुटुंबातील सदस्यांचे आधार नंबर जोडण्याचे फायदे आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button