धर्माबाद येथील सय्यद साजिद सर भूषण पुरस्काराने सन्मानित
धर्माबाद:- दिनांक 7 जनवरी 2024 रोज रविवार धर्माबाद येथील उर्दू शाळेचे शिक्षक सय्यद साजिद सर यांना राज्यस्तरीय ज्ञानभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ग्लोबल स्कॉलार फाऊंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आले. सदरील पुरस्कार यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ऑडिटोरियम
ऑडिटोरियम पुणे येथे पद्म श्री.सुधारक ओल्वे सर यांच्या हस्ते देण्यात आले असून हाशमी सय्यद साजिद सय्यद वाहिद हे धर्माबाद येथील उर्दु शाळेचे आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.
सदरील पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यावर जाहीर होते. सय्यद साजिद यांना ‘डायनॅमिक टीचर’ ची उपाधी देण्यात आली आपल्या कौशल्य,बुद्धिमत्ता व सामाजिक उपक्रम राबवून शहरात त्यांनी आपली एक वेगळी छाप सोडली आहे. सामजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे व अल्पसंख्याक समाजातील तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात दैनिक लोकमत समाचार चे तालुका प्रतिनिधी असून वर्तपत्रच्या माध्यमातून ते अन्याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करत असतात.
गेल्या १७ वर्षापासून धर्माबाद उर्दु प्राथमिक शाळा येथे आपली सेवा बजावत असून त्यांचे वडील एस. ए. वाहिद याच उर्दु प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांचे वडील आदर्श शिक्षक होते वडिलांचे आदर्श घेत ते जीवनात पुढे जात असून त्यांना ज्ञानभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.