महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका-२०२४ प्रकाशन सोहळा संपन्न
नांदेड:- आज दि.६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ” महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका – २०२४ ” प्रकाशन सोहळा मार्कण्डेय मंदिर गंगाचाळ नांदेड येथे सायंकाळी ६ वा. मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. सदरील दिनदर्शिका नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांना मोफत वितरित करण्यात येणार आहे.
या प्रकाशन सोहळ्यास अखिल भारतीय पद्मशाली संघम हैद्राबादचे गौरव अध्यक्ष श्री श्रीधर सुंकुरवार, उपाध्यक्ष श्री प्रल्हादराव सुरकुटवार, पद्मशाली समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री गोविंदभाऊ कोकुलवार, गोदावरी हातमाग सोसायटी नांदेडचे अध्यक्ष श्री तुलसीदासजी भूसेवार, शिवसेना नांदेड जिल्हा सहसंर्कप्रमुख श्री प्रकाशभाऊ मारावार, म.न.पा. नांदेड चे माजी नगरसेवक श्री राजेश यन्नम, श्री नागनाथ गड्डम, श्री नागेश कोकुलवार, युनायटेड पद्मशाली संघमचे युवक अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक श्री नंदकिशोर अडकटलवार, प्रौढ अध्यक्ष उमेश कोकुलवार, पीपल्स कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्रा.बालाजी कोंपलवार, गोदावरी हातमाग सोसायटी नांदेडचे संचालक सुभाष बल्लेवार,
किशोर राखेवार, अण्णा अनलदास, नांदेड जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे,पद्मशाली समाज युवक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्री संग्राम निलपत्रेवार, भाजपा नेते व्यंकटेश जिंदम, पद्मशाली समाज संघटनेचे नांदेड (उत्तर) तालुकाध्यक्ष श्री मल्लेश बल्ला, नांदेड (दक्षिण) तालुकाध्यक्ष श्री गणेश येल्लेवार, महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री नागभूषण दुर्गम, राज्यसचिव श्री संतोष गुंडेटवार, कार्याध्यक्ष श्री शिवाजी अन्नमवार, उपाध्यक्ष श्री विजय वड्डेपल्ली,श्री शंकरराव कुंटुरकर, सहसचिव नरसिंग गुर्रम, कोषाध्यक्ष गणेश भुसा, राज्य कार्यकरिणी सदस्य श्री नरसिमलू वंगावार, मराठवाडा उपाध्यक्ष नारायण अडबलवार, अनिल बिंगेवार, नांदेड जिल्हाध्यक्ष श्री विजय चरपिलवार, परभणी जिल्हाध्यक्ष विजय रामदिनवार, श्याम चिलकेवार, सिडको- हडको नांदेड चे चौधरी संजय टीप्रेसवार, रविंद्र कोमटी, सत्यानंद शिवरात्री, प्रकाश बोगा, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, संतोष गुम्मलवार, दत्ता कोंपलवार, जगन्नाथ तालकोकुलवार, सुग्रीव आल्लेवार,भारत गठ्ठेवार, महेश गाजुला, कोंडा गंगाधर, बुर्ला पेंटय्या, मेतकु विश्वनाथ,माधुरी मनोहर, बोगा नरसिंग, गणेश पोला, योगेश दुर्गम, तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
सदरील प्रकाशन सोहळ्यात संघटनेचे राज्याध्यक्ष नागभुषण दुर्गम यांनी प्रास्ताविकात पद्मशाली समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाचा प्रस्ताव मांडला. सदरील प्रस्तावास प्रतिसाद देत पद्मशाली समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष दानशूर व्यक्तिमत्त्व श्री गोविंदभाऊ कोकुलवार यांनी त्यांच्या मालकीचे असदवन नांदेड येथील सात हजार स्क्वेअर फूट जागा दान देण्याचे जाहीर केले. तसेच अनेक समाज मान्यवर नंदुसेठ अडकटलवार, राजुभाऊ यन्नम, प्रल्हाद सुरकुटवार, तुलसीदास भुसेवार, कविताताई नागनाथ गड्डम,नारायण अडबलवार, व्यंकटेश पुलकंठवार, मल्लेश बल्ला, गणेश पोला आदी समाज मान्यवरांनी देणगी जाहीर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी अन्नमवार यांनी केले व आभार विजय चरपिलवार यांनी मांडले.