हजरत सय्यद तुराबुल हक्क ऊर्स निमित्त व्यापारी महासंघाची वक्फ बोर्डाचे अधिक्षक सोबत बैठक
परभणी : (जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहें. यांच्या उर्सानिमित्त महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांच्या स्थगिती बहाल केल्या नंतर परभणी जिल्ह्यातील व्यापारी सोबत वक्फ बोर्डाचे अधिक्षक मुशीर अहेमद यांनी दर्गा रोड परिसरात एका बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उर्सात व्यापार्याना होणारी अडचण विषयी महत्वाची चर्चा झाली.
यावेळी सर्व व्यापार्यानी आप आपले म्हणणे मांडले सर्व व्यापार्यांचे विचार ऐकून वक्फ बोर्डाचे अधिक्षक मुशीर अहेमद यांनी समाधान कारक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशी आम्ही यावेळी अधीक्षक मुशीर अहेमद यांनी दिली या बैठकी प्रसंगी सय्यद कौसर वरिष्ठ समाज सेवक, मो.अब्दुला राज शिव अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी, युवा सेना उप शहर प्रमुख असलम शेख, मोहम्मद इब्राहिम साहब, सय्यद मोहिद्दीईन, शेख इब्राहिम इस