क्राईम

वाहन चालक व मालक संघटना यांचे बेमुदत संपाची खोटी अडिओ क्लीप

 

भारतीय दंड संहिता 2023 कायदयात नव्याने सुधारणा होवून रस्ता अपघातात ट्रक चालकास 10 वर्षाची शिक्षा केल्याचे निषेधार्थ दिनांक 09.01.2024 रोजीचे मध्यरात्री पासुन वाहन चालक व मालक संघटना हया बेमदत संपावर जाणार असल्याची व सदर कायदया अंतर्गत नांदेड जिल्हयात एस.टी. चालकास अटक करण्यात आले बाबतची खोटी व बनवाट अडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

सदर व्हायरल अडिओ क्लिपच्या अनुषंगाने माहिती घेतली असता सदर कायदया अंतर्गत नांदेड जिल्हयात कोणत्याही एस.टी. चालकास अटक करण्यात आलेली नाही. तसेच दिनांक 09.01.2024 रोजी नांदेड जिल्हयात व महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा बे-मुदत संप नाही त्या बाबत चालक मालक संघटनांचे पदाधिकारी यांनी संप नसले बाबत दुजोरा दिला आहे. सदरची व्हायरल अॅडीओ क्लिप कोणी तरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपने व्हायरल केली आहे.

सदरची अडिओ क्लिप हि बनावट असुन अशा कोणत्याही बनावट अडिओ / व्हिडोओ क्लिपवर विश्वास ठेवु नये अफवा पसरवणारे व्यक्ती बाबत काही माहीती असल्यास नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालय किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. त्यांचेवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आव्हान मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button