प्लास्टीक सींथेटीक धाग्यापासून वनवीलेला मांजा विक्री करणारे, दुकानदार यांचेवर कारवाई करण्या साठी पथकाची स्थापना.
मानवी व प्राणि जिवितास अपायकारक असलेला नायलॉन / प्लास्टीक सींथेटीक धाग्यापासून वनवीलेला मांजा खरेदी विक्री करणारे, साठा करणारे दुकानदार यांचेवर कारवाई करणेसाठी विशेष पथकाची स्थापना.
सर्व जनतेस श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडून याद्वारे अवाहन करण्यात येते की, नायलॉन सिंथेटीक धाग्यापासून बनविलेल्या मांजामुळे मानवी व प्राणी जिवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारे मानवी व प्राणी जिवितास अपायकारक असलेला नायलॉन / सिंथेटीक प्लास्टीक धाग्यापासून बनवलेला मांजा खरेदी/विक्री करणारे, साठा करणारे दुकानदार, त्यांची निर्मीती अथवा पुरवठा करणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व ३६ पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, अशा इसमांबाबत काही माहिती असल्यास त्या बाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास, ११२ या क्रमांकावर तसेच नजीकचे पोलीस ठाणेचे क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्यात यावी, माहिती देणा-या व्यक्तीचे नांव गोपनीय टेवण्यात येईल.
सदर अनुषंगाने संपूर्ण नांदेड जिल्हयासाठी चार विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन त्याचे प्रमुख श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा (मो.नं. ८३७८८०३००४ ) हे आहेत.
मकर संक्रात सणा निमित्त सर्व पतंग विक्री करणारे दुकानदार व पुरवठादार यांना याद्वारे अवाहन करण्यात येते की, कोणाही पर्यावरणास अपायकारक असलेल्या नायलॉन मांजाजी विक्री, पुरवठा, वाहतूक करु नये. असे आढळून आल्यास संबंधीत दुकानदार व पुरवटादार यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.