पोलीस स्थापना दिवस (Raising Day) निमित्ताने विविध कार्यकमाचे आयोजन..
दिनांक 02 ते 08 जानेवारी दरम्यान नांदेड पोलीस दलातर्फे ‘रेजिंग डे साजरा केला जात असून त्या अनुषंगाने दिनांक 05 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 08.00 ते 10.00 वा. च्या दरम्यान मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नादेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय नांदेड येथे, शहरातील विविध शाळेच्या विदयार्थ्यासाठी विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे सिरेमोनियल परेडचे आयोजन करून शिस्तबध्द पध्दतीने सचलन राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वात दाखविण्यात आले. तसेच नांदेड पोलीस दलातील डोंग ‘आझाद’ व त्यांचे हॅन्डलर जिलानी बेग यांनी चित्त थरारक प्रत्यक्षिक दाखवले, तर डॉग ‘बेला’ व त्यांचे हॅन्डलर अशोक मडावी त्यांचे इंर्जाज अयुब जाफर यांनी शिस्तबध्द कवायत करून सपुर्ण शाळेतील विदयार्थी, शिक्षकांचे, अधिकारी व अमंलदार यांचे मन जिंकले. अति जलद प्रतिसाद पथक यांचेकडुन एखादया व्यक्तीचे अपहरण केले तर त्यांची सुटका कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
शाळा, महाविदयालयातील मुला/मुलींना शस्त्र प्रदर्शन दाखवुन त्याबाबत माहिती देण्यात आली. शाळेतील विदयार्थ्यासाठी आपल्या मनातील नांदेड पोलीस दल या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली स्पर्धकामधुन उत्कृष्ठ चित्र काढणारा, उत्कृष्ठ मनोगत व्यक्त करणारा विदयार्थाचे निवड करून मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. महात्मा फुले हॉयस्कुल बाबानगर, ज्ञानमाता हॉयस्कुल विमानतळ, नारायणा इंग्लीस हॉयस्कुल, हेरिजेटल स्कुल नांदेड, गुजराती हॉयस्कुल वजिराबाद, गुरूकुल इंग्लीस मेडियम वजिराबाद सहयोग किंडस हॉयस्कुल नांदेड कंब्रीज विदयालय शिवाजीनगर, ऑक्सफंड ग्लोबल स्कुल निळारोड नांदेड इत्यादी शाळांनी सहभाग घेतला असून जवळपास शाळा 600 विदयार्थी हजर होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी श्रीमती अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक नांदेड, श्री विजय धोंडगे, रापोनि पोलीस मुख्यालय नांदेड, आणि त्यांचे अधिनिस्त अधिकारी व अमंलदार यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, मा. श्रीमती अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक नांदेड, मा. श्रीमती किरितीका सी. एम., सहा. पोलीस अधिक्षक नादेड (शहर). मा. सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, नांदेड श्री विजय धोंडगे, रापोनि पोलीस मुख्यालय नांदेड व शहरातील सर्व पो.स्टे.चे पोलीस स्टेशन प्रभारी, शाखा प्रभारी तसेच क्युआरटी, आरसीपी, पोलीस मुख्यालय येथील अंमलदार, हजर होते.