देश विदेश

6 दिवसांत गेलं ‘या’ IAS अधिकाऱ्याचं कलेक्टर पद, असं होतं कारण

यूपीएससी सिव्हिल सर्व्हीस, ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्ष क्रॅक करणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. श्रीराम व्यंकटरमण हे एक असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वात कठीण परीक्षा दुसऱ्या रँकसह क्रॅक केली होती.

ते 2012 चे UPSC टॉपर होते. खरे तर ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 5 ते 10 वर्षेही लागतात. मात्र, यांपैकी काही आयएएस असे असतात, ज्यांना फार लवकर कलेक्‍टर पदाची पोस्टिंग मिळते. पण विचार करा की, जर कवळ 6 दिवसांतच एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाली तर त्याला किती वाईट वाटत असेल. असेच IAS श्रीराम व्यंकटरमण यांच्यासोबत घडले आहे.

दारूमुळे गेली कलेक्‍टरकी! –
IAS श्रीराम व्यंकटरमन यांनी 2019 मध्ये नशेत गाडी चालवली आणि एका पत्रकाराला धडकले होते, असा आरोप आहे. या घटनेत पत्रकार केएम बशीर यांचा मृत्यू झाला होता. 35 वर्षीय बशीर सिराज ब्यूरो चीफ होते. यानंतर केरळ सरकारने त्यांना अलपुझा जिल्ह्याचे कलेक्टर बनवले होते. यामुळे तेथील जनतेने त्यांचा विरोध केला होता. यानंतर, सरकारला त्यांना कलेक्टर अथवा जिल्हाधिकारी पदावरून हटवावे लागले होते आणि त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली होती.

डॉक्टर ते IAS पर्यंतचा प्रवास –
व्यंकटरमन यांनी एमबीबीएस केल्यानंतर, यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसची तयारी केली होती आणि दुसऱ्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. एका IAS अधिकाऱ्याच्या रुपात व्यंकटरमन हे वादात राहिले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण भावांश विद्या मंदिर-गिरिनगर येथून पूर्ण झाले आहे. यानंतर त्यांनी वर्ष 2010 मध्ये गव्हर्नमेन्ट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाले.

तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने IAS अधिकारी श्रीराम व्यंकटरमन यांच्यावरील हत्येचा आरोप रद्द केला आहे. केरळ सरकारनेही 2020 मध्ये व्यंकटरमन यांचे निलंबन रद्द केलो होते. यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभागातचे ज्वाइंट सेक्रेटरी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. ते सध्या केरल स्टेट सिव्हिल सप्लाईज कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनरल मॅनेजर आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button