देश विदेश

गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का; म्हेवण्याची एस टी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी

कोल्हापूर: सहकार आयुक्तांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का दिला आहे. एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पदावर विराजमान असलेले गुणरत्न सदावर्ते यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांची पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे तसेच आरबीआयचे पूर्व परवानगी न घेता पदावर बसल्याने त्यांची व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी केली आहे. असे असतानाच आता सदावर्ते यांच्या युनियन बद्दल कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना दुसरा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून राज्यातील सर्वात मोठी एसटी कर्मचारी संघटना असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेतून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली राष्ट्रीय कर्मचारी सेना युनियनमध्ये सामील होणार असल्याचे संघटनेचे नेते संतोष शिंदे यांनी सांगितले आहे. त्याच कोल्हापुरात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन सोबत बोलत होते.

एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी

ऑगस्ट महिन्यामध्ये पार पडलेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. मात्र यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनमानी कारभार करत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांचे म्हेवणे सौरभ पाटील यांची नियुक्ती केली. मात्र या नियुक्तीनंतर अनेक जण त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत होते. व्यवस्थापकीय संचालकासाठी असलेल्या निकषांमध्ये सौरभ पाटील हे बसत नसल्याचा प्रमुख आक्षेप होत होता. तर मागील काही महिन्यांत सदावर्ते यांच्याकडून मनमानी कारभार चालू होता संचालकांना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेण्यात येत होते. असा आरोप करत १९ पैकी तब्बल १४ संचालकांनी त्यांच्या विरोधात बंड केला.
सदावर्ते यांच्या मनमानी कारभारामुळे बँकेतील ठेवी मोठ्या प्रमाणात काढून घेतल्या जात आहेत. यामुळे बँक संकटात येत आहे असे बंडखोर संचालकांच्यावतीने सहकार आयुक्तांकडून पत्र लिहून सौरभ पाटील यांना काढून टाकण्यास सांगितले होते. दरम्यान सहकार आयुक्तांनी सौरभ पाटील यांची नियुक्ती ही निकषात बसत नसल्याचे सांगत एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी केली आहे. यामुळे गुणरत्न सदावर्ते त्यांना मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश करणार

तर दुसऱ्या बाजूला आता सदावर्ते यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले कर्मचारी देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील तब्बल २५ हजारहून अधिक सभासद असलेली संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेतील सभासद संघटनेला सोडचिठ्ठी देणार आहेत. सौरभ पाटील यांची पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर बंडखोर संचालकांचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया देत जैसे त्याचे कर्म तसे त्याचे फळ म्हणीप्रमाणे सदावर्ते यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले आहेत. ज्या कायद्याच्या जोरावर त्याने पीएचडी मिळवली त्याच कायद्याने त्यांना कायदेशीर पायतान दिला आहे. यामुळे सदावर्ते यांच्या एसटी बँकेमध्ये सुरू असलेल्या विकृत चाळ्याना पूर्णविराम मिळाला आहे. यापुढे सदावर्ते यांच्या माकड चाळ्याना राज्यातील एसटी कामगार बळी पडणार नाहीत.

एक-दोन जे गाढव (पदाधिकारी) पाळलेले आहेत ते सोडून त्यांच्या कारभाराला कंटाळलेले एसटी जनसंघातील पंचवीस हजार कर्मचारी एक जानेवारीपासून वेगळी भूमिका घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी सेना या संघटनेत आम्ही प्रवेश करणार आहोत. या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे. आमच्या मागण्या संदर्भात ते देखील सकारात्मक असून लवकरच आम्ही राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश करू, असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button