धर्माबाद पोलीसांची मटकाकिंगसह तिघांना घेतले ताब्यात, १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
धर्माबाद :- धर्माबाद शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मटक्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. शहरातील विविध भागात सर्रासपणे मटका सुरु असताना पोलिसांकडून मुख्य बुकीवर कारवाई होण्याऐवजी पंटरवरच कारवाई केली जात होती असे जनसामान्यांतुन बोलले जात होते. शिवाय झालेल्या अनेक कारवाईत फारसा मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे, परंतु ह्या सर्व बाबींना तिलांजली देत परवा धर्माबाद शहरातील रामनगर परीसरात सुरु असलेल्या मटक्याच्या बुकीवर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, केवळ पंटरच नव्हे मुख्य मटका चालवणाऱ्यावरही कार्यवाही करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस निरीक्षक यांच्या पथकाला प्रकाश सोनटक्के नावाचा व्यक्ती हा मटका घेतो असा अंदाज होता तरी पोलीस पथकाने सापळा रचून सोनटक्के याची चौकशी करुन विचारपुस केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोबाईलमधील व्हाट्सअप चॅटिंग चेक केलेअसता त्याने कबूल केले की मी एजंट आहे दहा टक्के कमिशनवर मटक्याचा धंदा घेतो व बाकी ९०टक्के हे मटका किंग सिनु अंदेलवार यांना देतो अस सांगितल असता व व्हाट्सअप ची चॅटिंग मध्ये असलेल्या नंबर वर मालक सिनु अंदेलवार मुनिम दिगांबर गिरीधारी यांचा मोबाईल नंबर आढळून आल्याने मटका खेळु घालणा-या मटका किंग यांना गुन्हा रजिस्टर नंबर 303 आरोपी सिनु (श्रीनिवास) अंदेलवार ह्यासह त्याच्या मुनिम आरोपी गिरीधारी दिगांबर मवाळकर या दोघांना ताब्यात घेऊन मोबाईल व मुद्देमाल ११ हजार रुपये जप्त केले तर CR नंबर ३०४ आरोपी प्रकाश लक्ष्मण सोनटक्के ८हजार८०० रुपये CR ३०५ आरोपी संजय लक्ष्मण सोनकांबळे ८ हजार ५०० रुपये एकूण १८४०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पथका मध्ये सहायक पोलिस निरीक्षक गोपाळ सूर्यवंशी पोना महेश माकुरवार, पो.हेका शंकर घेवारे, पो.का.सचिन गडपवार मपोका शोभा वाघमारे मॅडम हे होते .१२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या पथकाने रामनगर जवळ सापळा रचून मटकाचालकांवर छापा टाकला. त्यात वरील आरोपी हे पळून जात असताना त्यांना पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले व त्यांची चौकशी केली असता ते लोकांना जमवून त्यांच्याकडून पैसे घेऊन मिलन,टाईम, कल्याण,नावाचा मटका जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांच्याकडून १८ हजार ४०० रुपये व मटका जुगाराचे साहित्य, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी पोहेका शंकर घेवारे, फिर्यादी पोना महेश माकुरवार यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष संगेवार हे पुढील तपास करत आहेत. कधी नव्हे ते मटका घेणाऱ्यावर नव्हे तर मुख्य मटका चालवणाऱ्या विरुद्ध कार्यवाही केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.