कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधीकारी यांचे उपोषणाकडे दुर्लक्ष – नारायण गायकवाड
नांदेड प्रतिनिधी -. कंधार तालुक्यातील पेठवडज येथील ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणचा दूसरा दिवस संपला तरी जी. प. प्रशासनाने या उपोषणाकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. कर्तव्यदक्ष नव्या पिढीचे अधिकारी म्हणून जिल्ह्याभर कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे जिल्ह्यातील सामान्य नागरिक आशेने पाहत आहे मात्र खंडोबा जत्रेच्या तयारीत सामान्यांच्या जीवना मरणशी निगडित असणाऱ्या प्रश्नावर प्रांगणात सुरु असलेल्या आंदोलनाकडे त्यांनी कानाडोळा करूनही बघितले नाही अशी खंतवजा प्रतिक्रिया उपोषणकर्ते नारायण गायकवाड यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
कंधार कृषी उत्पन बाजार समिती चेअरमन नारायण गायकवाड यांच्यासह अनेकांनी मौ. पेठवडज येथील निजाम कालीन शाळेचे इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर शाळेच्या कामाकरीता गावातील जनतेने १० % लोकवाटा भरला आहे. त्यामुळे पेठवडज येथील नागरीकांना अपेक्षा होती की, शाळेचे काम दर्जेदार होईल पण झाले उलटेच. या कामामध्ये शिक्षणाधिकारी प्रा., सर्वशिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंता व सर्वशिक्षा अभियानचे कनिष्ठ अभियंता यांनी संबंधित बांधकाम एजन्सी सोबत संगनमत करून काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. सदरील काम तात्काळ थांबवून या झालेल्या कंची चौकशी करण्यात यावी. व पुढील काम दर्जेदार व्हावे यासाठी जी. प. प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची गुणानियंत्रका मार्फत चौकशी करुन योग्यती कार्यवाही करावी.
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी निवाऱ्याची इमारत पुर्ण मोडकळीला आली आहे. त्या बांधकामाच्या निधीसाठी जी.प. प्रशासनाकडे कार्यालयाकडे वारंवार पाठपुरवठा केला आहे.परंतु अद्याप ती मागणी पूर्ण झाली नाही. ती तात्काळ पूर्ण करावी.
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ ची इमारत व कर्मचारी निवाऱ्याची इमारतची स्थितीही अतिशय बिकट आहे. ती तात्काळ दुरुस्त करावी. घरकूल लाभार्थ्यांना शासन निर्णया प्रमाणे घरकूल मंजूरी द्यावी. यासह गावातील व परिसरातील नागरिकांसाठी जीवनावश्यक असलेल्या मागण्या घेऊन
मागण्या घेऊन गायकवाड हे उपोषण करीत आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस संपला मात्र त्यांची कोणीही दाखल घेतली नाही.
याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गायकवाड गेली अनेक महिन्यापासून या मागणीसाठी जी. प. दरबारी खेटा मारत आहेत मात्र असा समस्यांकडे नजर अंदाज करीत राजकीय व प्रसिद्दीच्या विषयाच्या मोहात असलेल्या जी. प. प्रशासनकडून या आंदोलनाची साधी दखलही घेतल्या गेली नाही याबद्दल गायकवाड यांनी खंत व्यक्त केली आहे. प्रशासन या मागण्यांकडे लक्ष देत नसेल तर मंत्रालयासमोर उग्र आंदोलन करू असा इशारा गायकवाड यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे. विशेष म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यांचेकडे नांदेड जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. त्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या आंदोलनाची दोन दिवसात साधी दखलही घेतली नाही याबद्दल नारायण गायकवाड यांनी आश्चर्य व खंत व्यक्त केली आहे. दरम्यान आज भाजपचे माजी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर पत्रकार प्रल्हाद उमाटे यांनी उपोषणास भेट दिली.