बहिण भावाच्या नात्यामध्ये झालेल्या बेबनावातुन गहाळ झालेले 20 तोळे सोने वजिराबाद पोलीसांनी मिळवुन दिले.
वयोवृध्द महिला नामे संगीता प्रशांत उत्तरवार, राहणार आदिलाबाद, तेलंगाणा यांनी पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेडचे मा. पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड यांना भेटुन कळवले कि, त्यांच्या दोन मुली उच्च वैदयकिय शिक्षण घेत आहेत तसेच मी आरडी एजंट म्हणून काम करते व माझ्या दोन मुलींना वैदयकिय शिक्षण शिकवते तसेच माझे पतिचे स 2013 मध्ये दिर्घ आजाराने निधन झाले असुन त्यांनी आमच्या मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी भविष्याची तरतुद म्हणा त्यांनी सोन्याचे 20 तोळयांचे दागिने ज्यामध्ये 03 तोळयांचा लक्ष्मीहार व 12 तोळयांच्या पाटल्या 03 जोडी झुमके अडी तोळयांचे, 01 तोळ्याची अंगठी व मणी मंगळसुत्र 02 तोळे असे घेतलेले होते व त्यांनी त्यांचे वडिल मधुकरराव रामकिर पारसेवार यांचे नावावर असलेले सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, वजिराबादच्या लॉकरमध्ये ठेवले होते.
त्यांचे निधन एप्रिक 2021मध्ये निधन झाले होते व त्यांचे नॉमिनी म्हणुन त्यांचा मुलगा दत्ता मधुकरराव पारसेवार याचेकडे नॉमिनी म्हणुन त लॉकरचा ताबा देण्यात आला यानंतर झालेल्या कौटुंबिक कलहातुन वयोवृध्द महिला नामे संगीता प्रशांत उत्तरवार, राहण आदिलाबाद, तेलंगाणा यांचे सदर दागिने हे गहाळ झाले आहेत व त्यांच्या मुलींची शैक्षणिक फिस भरण्यासाठी काही दामि मोडुन फिस भरणे आहे याबाबत त्यांनी मा. पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड यांचेकडे मदत मागितली असता त्य पोलीस उप निरीक्षक प्रविण आगलावे, पोहेकॉ/126 बालाजी नागमवार, पोना/2651 शंकर बिरमवार यांना सदर प्रकरणामा मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश दिले असता पोलीस उप निरीक्षक प्रविण आगलावे व त्यांच्या पथक तात्काळ कारवाई करत त्यांचा भाऊ दत्ता मधुकरराव पारसेवार याला ताब्यात घेवुन मा. पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरक यांचेसमक्ष हजर केले असता मा. पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड यांनी वयोवृध्द महिला नामे संगीता प्रशांत उत्तर यांचा सख्खा भाऊ दत्ता पारसेवार याला आपल्या पध्दतीने समजावुन सांगितले तसेच त्याचे समुपदेशन केले कि, तुझी बा हि विधवा आहे.
तसेच ती काबाड कष्ट करुन तिच्या मुलींना उच्च वैदयकिय शिक्षण शिकवत आहे तु त्यांना आधार गरजेचे आहे तसेच तुमच्या भावा भावांच्या घरातील मालकीच्या वादामध्ये बहिणीला विनाकारण त्रास देवु नका अन्न आम्हाला कठोर कायदेशीर कारवाई करावी लागेल अशी पोलिसी भाषेत समज देताच दत्ता मधुकरराव पारसेवार याने बहिष् गहाळ झालेले सोन्याचे 20 तोळयांचे दागिने ज्यामध्ये 03 तोळयांचा लक्ष्मीहार व 12 तोळयांच्या पाटल्या 03 जोडी इस अडीच तोळयांचे, 01 तोळ्याची अंगठी व मणी मंगळसुत्र 02 तोळे असे हजर केले व आज रोजी मा. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संगीता प्रशांत उत्तरवार यांना पोलीस स्टेशन वजिराबाद येथे बोलावुन त्यांचे इतर नातेवाईकांचे स सर्व दागिने सुखरुप परत करण्यात आले आहे. दागिने परत मिळताच वयोवृध्द महिला नामे संगीता प्रशांत उत्तरवार वैदयकिय शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुली ऐश्वर्या व मैथिली सर्व राहणार आदिलाबाद, तेलंगाणा यांनी नांदेड पोलीसांचे अ मानले.
सदरील कारवाई बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक अबिनाश क मा. अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज गुरव यांनी पोलीस स वजिराबादचे पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड, पोलीस उप निरीक्षक प्रविण आगलावे, पोहेकॉ/126 बालाजी नागम पोना/2651 शंकर बिरमवार यांचे कौतुक केले आहे