देश विदेश

‘आकाश’ जमिनीवर, ‘दीपक’ अंधारात; नगर परिषदेचे मुख्याधिकारी लाच घेताना रंगेहात ताब्यात

बुलढाणा : बुलडाणा जिल्हा प्रशासनात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यामध्ये जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक अडकले आहेत. बारा हजार रुपयांची लाच घेताना या दोघांना आज एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली होती.

लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे या संबंधीची तक्रार ठेकेदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास सापळा रचून जळगाव जामोदचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे (वय ३२) आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके (वय ३०) या दोघांना तक्रारदाराकडून बारा हजार रुपयांची लाच घेताना नगर परिषदेतच रंगेहात पकडले.

विशेष म्हणजे आरोपी मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक हे दोन्ही तरुण असून आकाश डोईफोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हा मोताळा तालुक्यातील उबाळखेडचा मूळ रहिवासी आहे. ही धाडसी कारवाई पो.उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे, पो.नि. सचिन इंगळे, महेश पथक स.फौ. शाम भांगे, पो.हे.कॉ. विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, पो. ना. जगदीश पवार,विनोद लोखंडे, पो.कॉ. शैलेश सोनवणे, म.पो.कॉ. स्वाती वाणी आणि चालक पो.ना. नितीन शेटे, पो.कॉ. अरशद शेख सर्व ला.प्र.वि बुलढाणा यांच्या पथकाने केली आहे. त्यांना मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र आणि देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले. सदर घटनेनं जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली असून मुख्याधिकारी संवर्गाच्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्याची घटना प्रशासनाची मान शरमेने झुकवणारी आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button