शिक्षण
अधिकाऱ्याच्या चिरीमिरी ने संस्थाचालक शाळा त्रस्त, दिव्यांग शाळांचे वेतन रोखले, संबधीत अधिकाऱ्याला निलंबित करण्याची समाज कल्याण आयुक्ताकडे मागणी
नांदेड /प्रतिनिधी – नांदेडच्या जिल्हा परिषदेतील समाज कल्याण कार्यालय एका अधिकाऱ्याच्या कारनाम्यामुळे चांगलाच चर्चेत आल आहे. चरिमिरी घेऊन कुठलेही काम करण्याचा धंदा या अधिकाऱ्याने चालवलाय आहे. या महाशयाने तर चरिमिरी देणाऱ्यांचे पगारी काढल्या आणि ज्यांनी काही दिलं नाही त्यांच्या फाईली बाजूला ठेवल्या.विनाकारण दिव्यांग संस्थांना आणि शाळांना वेठीस धरणाऱ्या या अधिकाऱ्याची चौकशी करावी त्यांना निलंबित करुन बदली करावी अशी मागणी निवेदनाद्वारे बहुजन शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्या वतीने समाजकल्याण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
दलालांना सोबत घेऊन हा अधिकारी संस्थांना आणि शाळांच्या मुख्याधकयापकांकडून चरिमिरी घेतो. चिरीमिरी दिली नाही तर तुमची दिव्यांग शाळा बोगस आहे. बंद करुन टाकतो अशा धमक्या देतो.या अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासाला अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक, कर्मचारी कंटाळले असून, संबधीत अधिकाऱ्याची तातडीने चौकशी करुन त्याला निलंबित करावे अशी मागणी ही संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्त पुणे हे काय दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.