जिला

भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला उडवले; भीषण अपघात पत्नीचा मृत्यू, पतीसह चालक जखमी

जखमींना भोकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भोकर  : शहरातील बायपास मार्गावरील उमरी रस्त्यावर ट्रकने ऑटोरिक्षाला आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. यात ऑटोरिक्षातील प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या पतीसह चालक गंभीर जखमी झाला आहे.
कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड (५० वर्षे, रा. रायखोड ता. भोकर) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड या पतीसह भोकर येथून रायखोडकडे ऑटोरिक्षामधून (क्र. एम एस २६ एजी ४१५७) प्रवास करत होते. दरम्यान, म्हैसाकडून नांदेडकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने (क्र. एपी ०७ टीजी २२५९) बायपासवरील सुभेदार चौक येथे ऑटोरिक्षाला जबर धडक दिली.
या भीषण अपघातात कौशल्याबाई लक्ष्मण कोईलवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मण कोईलवाड व ऑटोरिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी चालकाचे नाव समजू शकले नाही. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button