“पॅलेस्टाईन, झिओनिझम आणि भारत” उबेद बाहुसेन लिखित पुस्तकाचे प्रकाशन
लेखक शेख अकरम (भाषांतर रियाज शेख)
एका विचारवंताचे म्हणणे आहे की “एखाद्या राष्ट्राने आपला भूतकाळ विसरला तर त्याचे भविष्यही अंधकारमय बनते.”
उबेद बाहुसेन या नांदेड येथील स्थानिक तरुणाने लिहिलेल्या “पॅलेस्टाईन, झिओनिझम आणि भारत” या पुस्तकात पॅलेस्टाईनचा इतिहास एक व्यापक आणि आधुनिक शैलीमधे थोडक्यात मांडलेला आहे. जे वाचल्यानंतर वाचकाला पॅलेस्टाईनच्या भूमीचे महत्त्व आणि पॅलेस्टाईनची समस्या समजून घेणे खूप सोपे होते. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर रॉकेट डागल्यानंतर, इस्रायलने गाझामधील रक्तपात, नरसंहार, दडपशाही करुन तिथे अराजकता माजवली होती, परंतु प्रत्येक न्यायप्रेमी व्यक्ती याच्या निषेधार्थ आवाज उठवत आहे. मात्र, पॅलेस्टाईनच्या इतिहासाची आणि समस्येची त्यांना माहिती नसल्यामुळे मूक प्रेक्षक राहून गोंधळाला बळी पडणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.
सध्याच्या काळात जिथे अभ्यासाची आवड कमी होत चालली आहे तिथे खरा इतिहास पुसून लोकांची दिशाभूल करत आहेत. अशा परिस्थितीत, इतिहासाच्या दस्तऐवजीकरण करुन परिचय करण्याचे महत्त्व स्पष्ट होते. लेखकाने पुस्तकाची सात (७) प्रकरणांमध्ये विभागणी केली असून दोनशेहून अधिक उपशीर्षकाखाली महत्त्वाच्या घटना लिहिल्या आहेत. ज्यामध्ये पॅलेस्टाईनचा भूतकाळ, पॅलेस्टाईनचे नेतृत्व, पॅलेस्टाईनची सद्यस्थिती, पॅलेस्टाईनच्या समस्येवर संभाव्य उपाय आणि पॅलेस्टाईन आणि भारत यांच्यातील संबंध इत्यादींवर प्रकाश टाकण्यात आला.
उपरोक्त पुस्तक पॅलेस्टाईनची समस्या समजून घेण्यासाठी केवळ फायदेशीर आणि उपयुक्त ठरणार नाही, तर हक्क आणि न्यायासाठी आवाज उठवण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल.
लेखक उबेद बाहुसेनची गणना अशा तरुणांमध्ये होते. जो समाजातील अन्याय-अत्याचार, मैदानावरील कृतीबरोबरच तो आपल्या लेखणीच्या आवाजानेही उठवतो. उबेद बाहुसेन हा मूळचा महाराष्ट्रातील नांदेडचा रहिवाशी असून, तो पुणे शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागात सहायक प्राध्यापक होता. सध्या तो एका नामांकित कंपनीत आयटी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थीदशेपासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर लेखन करत असून त्यांचे लेख राष्ट्रीय व राज्यस्तरीय वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत आहेत. विशेषत: रोहिंग्या मुस्लिम, पॅलेस्टाईन, सीरिया आणि विविध राजकीय आणि सामाजिक समस्यांवर लिहिलेले लेख देशभरातील विविध भाषांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
याआधी हिंदीत लिहिलेल्या ‘मुसलमानांनी शस्त्रे बाळगावीत का’ या पुस्तकाला #Amazon Kindle वर वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. उबेद बाहुसेन यांच्या “पॅलेस्टाईन, झियोनिझम आणि भारत” या नवीन पुस्तकाकडेही न्यायप्रेमी जनतेकडून आदराने पाहिले जाईल, अशी आशा आहे. पुस्तकाची विशेष बाब म्हणजे यात संक्षिप्ततेला प्राधान्य देण्यात आले असून सामान्य ज्ञानाचे शब्द वापरण्यात आले आहेत ज्यातून कमी शिकलेल्या तरुणांनाही चांगली माहिती मिळू शकते. साहित्य शोधणे, चाळणे आणि त्याची मांडणी करणे यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. हे पुस्तक ‘इलम स्टोअरस’ उर्दू प्रकाशक’ द्वारे प्रकाशित केले गेले आहे आणि त्यात रंगीत मुद्रित मुख्यपृष्ठे असे मिळून २३२ पृष्ठे आहेत. एकंदरीत, पॅलेस्टाईनची समस्या अगदी सहजपणे समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. नाविण्यपुर्ण व पॅलेस्टाईनचा ईतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकास आमच्या शुभेच्छा…