शासकीत अधिकारी कर्तव्य,नाकर्तेपणाच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन
नांदेड दि.01, नांदेड महापालिकेच्या नाकर्तेपनाच्या विरोधात १२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम प्रहारच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याशेजारील, शासकीय गोदाम असलेली कोठ्यावधीची जागा शासनाकडून १० कोठी रुपयात घेऊन खाजगी बिल्डरला कवडी मोलात विकून महापालिकेचे व नांदेड करदात्यांच मोठं आर्थिक नुकसान केलं आहे.
बांधा,वापरा व हस्थांतरित करा धोरनाचा वापर करून,व्यापारी संकुलासाठी दोनच निविदा आल्या असता राजकीय बिल्डरचे हित जपण्यासाठी अब्जावधीची जागा केवळ २० कोठीत देऊन महापालिका व करदात्याचे आर्थिक नुकसान केले आहे.
खुल्या बाजाराच्या स्पर्धेत गोडाऊनची जागा बिल्डरला देण्याअगोदर पुन्हा निविदा काढावी व जास्त बोली बोलणाऱ्याना व्यापारी संकुल बांधणाऱ्या बिल्डरला व्यापारी संकुल विकसित करण्यास द्यावे,अशी मागणी भीम प्रहारच्या वतीने मा.आयुक्त मनपा नांदेड यांच्याकडे केली होती,आयुक्ताने या मागणी कडे दुर्लक्ष केल्याने मनस्ताप झाल्यामुळे १२ डिसेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
नांदेड शहरांची सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपणारे कलामंदिरची इमारत, विनापरवाना जमीनदोस्त करून,नियमबाह्य व्यापारी संकुल बांधणाऱ्या व्यापारी व बिल्डरच्या विरोधात मनपा प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेऊन,रीतसर दुकान परवाना व विधुत मंडळाचे लाईट घेऊन घेऊन,टेलरचा ३० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या पांडुरंग ढगे यांचे,रस्त्यात गेलेल्या दुकानाचे पुनर्वसन करावे,अशी मागणी भीम प्रहारचे जिल्हाअध्यक्ष दीपक पवले यांनी केली आहे.
आयुक्त,विध्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहेत
मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विध्यार्थ्यांकडून लाखो रुपये वसुल करणाऱ्या महाविद्यालयावर कार्यवाही करावी,असे निवेदन समाज कल्याण आयुक्त यांना जुलैमध्ये दिले आहे.त्याची दाखल उपाआयुक्त,समाज कल्याण विभागने घेतली नसल्याने आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
‘ना’ लायक शिक्षकांचे वेतन बंद करा
प्रेरणा परीक्षेस दांडी मारणाऱ्या ना लायक शिक्षकांचे वेतन बंद करा,नांदेड जिल्ह्यातील अनधिकृत,विनापरवानगी,चालत असलेल्या शाळांची नावे जाहीर करावे,अशी मागणी जून २०२३ मध्ये शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे,भीम प्रहारच्या वतीने केली होती, शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या मागणीकडे लक्ष दिले नाही,यांचा आम्हांला खेद वाटतो,म्हणून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे.
वेटबिगारी कायद्यानुसार गुन्हा नोंदवा
मुदखेड नगर पालिकेत,कंत्राटी मनुष्यबल पुरवण्याऱ्या संस्थने दाखल केलेल्या कामगारांना वेतन देताना,किमान वेतन आयोगाचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे वेटबिगारी कायद्यानुसार कार्यवाही करावी,या व इतर मागण्यासाठी १२ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते श्याम निलंगेकर,काकासाहेब डावरे,दीपक पवले,कुणाल लांडगे प्रमोद वैद्य,कावेरी ढगे,यशवंत थोरात,सुमित धोत्रे,स्वाती खंदारे, रंजना भालेराव याच्यासह अनेक कार्यकर्ते आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत,असे भीम प्रहारणे प्रसिद्दी पत्रक दिले आहे.