MSRDच्या उपाध्यक्षपदावरुन राधेश्याम मोपालवार यांना हटवलं; अनिल गायकवाड नवे व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरुन हटवण्यात आले आहे. याआधी सात वेळा त्यांना मुदत वाढवून मिळाली होती. त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड हे असणार आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय पदात मोठा बदल करण्यात आला आहे. (MSRDB) वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपालवार यांना अखेर हटवण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यांच्या जागी अनिल गायकवाड हे नवे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहेत. या आधी राधेश्याम मोपालवार यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे यांच्या काळातही त्यांना स्थान मिळाले होते. तसेच तब्बल सात वेळा त्यांना मुदतवाढवून मिळाल्याने ते चर्चेचा विषय ठरले होते.
रम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (De यांच्या कार्यकाळातील महत्वांकाशी प्रकल्प असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामातही राधेश्याम मोपालवार यांनी काम पाहिले आहे.