क्राईम

मैं रिंदा बोल रहा हूं खंडणी मागणारे दोन आरोपी पोलीसांचे ताब्यात

 

दिनांक 12.11.2023 रोजी कौठा, नांदेड भागातील ब्युटीपार्लर व्यावसायीक यांना वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून कॉल करून रिंदाचे नाव घेवून मैं रिंदा बोल रहा हु आज रात नऊ बजे तक रूपये पाच लाख रेडी रखना और पोलीस मे कम्प्लेंट दिया तो तेरी खैर नही तेरे औरे तेरे बच्चे के तुकडे कर ढुंगा असे म्हणुन पाच लाख रूपयाची खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने पोस्टे नांदेड ग्रामीण येथे दिनांक 15.11.2023 रोजी गुरनं. 820/2023 कलम 387,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास पोउपनि / श्री बाबुराव चव्हाण पोस्टे नांदेड ग्रामीण यांनी केला.

 

तपासा दरम्यान त्यांनी गुन्हयातील संशयीत आरोपी नामे 1) अमित अनिल सवामचन वय 21 वर्षे रा. वाल्मीक नगर, नांदेड 2) जसप्रितसिंग प्रतापसिंग मठाळू वय 20 वर्षे रा. गुरुव्दारा गेट नं. 1 नांदेड यांना ताब्यात घेवून गुन्हयासंबंधाने चौकशी केली आम्ही दोघांनी मिळून पैशाचे लोभापोटी फिर्यादीस वेगवेगळ्या मोबाईल वरून पैशाची मागणी केली होती. असे प्राथमिक तपासात सांगत आहेत. सदरची कार्यवाही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री आबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्री. सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा नांदेड,

 

मा. श्री जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक, मा. श्री. उदय खंडेराय, पोनि स्थागुशा, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री श्रीधर जगताप, सपोनि, श्री बाबुराव चव्हाण, पोउपनि, पोस्टे नांदेड ग्रामीण, पोहेकॉ / ज्ञानोबा कौठेकर, पोकों / संतोष बेलुरोड, शेख सत्तार, स्वामी, अर्जुन मुंडे, शिवांनंद कानगुले, पोस्टे नांदेड ग्रामीण, सायबर पोस्टेचे, पोउपनि / दळवी, पोहेकों/ राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, मपोकों/पठाण यांनी कार्यवाही केली आहे. नांदेड जिल्हयातील नागरीकांना असे कोणतेही धमकीचे कॉल आल्यास पोलीसांशी संपर्क साधाण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी केले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button