३७ व्या राष्ट्रीय खेळ गोवा २०२३ सेपक टकारॉ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात नांदेड चा असंग जोंधळे याची निवड .
३७ वी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड स्पर्धा ३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे महाराष्ट्र राज्य सेपक टकारॉ असोसिएशन च्या अंतर्गत नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. मागील १३ वर्षांनंतर महाराष्ट्र सेपक टकारॉ संघाचा समावेश गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय खेळ मध्ये झाला आहे. महाराष्ट्र राज्य संघ निवड समिती ने एकुण १२ जिल्ह्यातील ३० खेळाडूं मधून संघ निवडला, या खेळाडूं मध्ये नांदेड जिल्ह्यातील असंग जोंधळे, सुदेश कांबळे यांचा सहभाग होता यांपैकी असंग जोंधळे ची निवड महाराष्ट्राच्या संघात झाली आहे.
जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे, ही ३७वी राष्ट्रीय खेळ गोवा २०२३ स्पर्धा ३० ऑक्टोबर ते ३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मडगाव (गोवा) येथे होणार आहे. असंग जोंधळे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
असंग जोंधळे हा लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल च्या स्पोर्ट्स क्लब मध्ये आपला सराव करत असतो त्याला नांदेड जिल्हा सेपक टकारॉ असोसिशन चे सचिव प्रवीणकुमार कुपटीकर, लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल चे अध्यक्ष रवींद्र रेड्डी सर जिल्हा क्रीडा अधिकारी संजय बित्तेवार जिल्हा क्रीडा अधिकारी बालाजी शिरशिकर , क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर , रविकुमार बकवाड नांदेड जिल्हा सेपक टकारॉ असो.च्या सर्व खेळाडूं तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.