क्राईम
पो.स्टे शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कार्यवाही आरोपीकडुन एक अग्नीशस्त्र ( पिस्तुल) व एक जिवंत काडतुस जप्त
दिनांक 27/10/2023 रोजी दुर्गादेवि विसर्जन अनुशंगाने सहापोलीस निरीक्षक श्री आश्रवा घाटे सर यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी य अमलदार यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करणेकरीता पोलीस स्टेशन शिवाजीनगर हददीत दुर्गादेवी स्थळी भेटी व पेट्रोलींग करत असतांना गुन्हे शोध पथकातील पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, रोड नंबर 26 येथील रमामाता आंबेडकर नगर पीटीजवळ एक इसम पिस्तुल सोबत बाळगुन फिरत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्यावरुन सदर माहीती ही वरिष्ठांना देवून गुन्हे शोध पथकातील पथक प्रमुख मिलींद सोनकांबळे व पथकाती कर्मचारी असे रोड नंबर 26 येथील रमामाता आंबेडकर नगर पीटीजवळ सापळा लावुन आरोपी नामे सागर उर्फ मुन्ना शामसींग परमार वय 26 वर्ष, व्यवसाय अॅटो चालक रा. सखोजी नगर नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून 1) एक लोखंडी गावठी बनावटी असलेला अग्णिशस्त्र पिस्तुल काळ्या कलरची मुठ असलेली ज्यात एक मैग्जीन असलेली जु.वा. कि. अं. 20,000 /- रुपये व 2) एक जिवंत काडतुस जु.वा. कि. अं. 2000/- रुपये असा एकुण 22,000/- रुपये, चा मुद्देमाल जप्त करुन गुरनं 350/23 कलम 3/25 आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक नांदेड मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मोकर डॉ. श्री खंडेराव धरणे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुरज गुरव, सहापोलीस निरीक्षक आश्रवा घाटे पोलीस स्टेशन शिवाजीनगर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे, व पो.हे.कॉ/835 रविशंकर बामणे, पोकों/ 3011 देवसिंग सिंगल, पोकों/3099 शेख अझहर, पोकों 3218 लिंबाजी राठोड, पोकों 1466 अंकुश लंगोटे, पोकों 3147 दत्ता वडजे यांनी पार पाडली.