स्पोर्ट्स
विभागीय शालेय सेपक टाकरा स्पर्धेत लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल चे वर्चस्व
उप संचालनालय क्रीडा युवक सेवा लातूर विभाग लातूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड च्या वतीने व नांदेड जिल्हा सेपक टाकरा असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने विभागीय शालेय सेपक टाकरा स्पर्धेचे आयोजन श्री गुरुगोबिंडसिंघजी स्टेडियम नवीन इनडोअर हॉल येथे आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत नांदेड येतील लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल नांदेड च्या 14,17 वर्ष मुले व मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला स्पर्धेत लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल च्या संघाने सहा पैकी पाच गटात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय सेपक टाकरा स्पर्धेत आपल वर्चस्व कायम ठेवले.
यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे 14 वर्ष मुलेः आर्यन केशेट्टीवार, हर्ष वनंजे आदर्श गजभारे, प्रथमेश पडघनकर, निकुंज भालेराव 14 वर्ष मुली: तेजस्विनी काळे (कर्णधार) अनुष्का सरपाते रजनंदिनी दुधमल, ईश्वरी आडे, अदिती सोनुले 17 वर्ष मुले: वेदांत दासे, वेदांत सुर्यवंशी, शाश्वत गोधणे, ओमप्रकाश गोरेकर, अथर्व जोशी 17 वर्ष मुली: सृष्टी नरवाडे, साक्षी गच्चे, रिया महिंद्रकर, तेजस्विनी वाघमारे 19 वर्ष मुलीः प्रशंसा वाडीकर, सृष्टी बंगरवार प्रणाली रगडे अदिती भागवत, गोरी भोजने आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले वरील यशस्वी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे शाळेचे अध्यक्ष रवींद्र रेड्डी सर, प्राचार्य केदार शर्मा मुख्याध्यापिका उज्वला राणे, जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीणकुमार कुपटीकर, क्रीडा अधिकारी बालाजी शिरशीकर, क्रीडा अधिकारी संजय बित्तेवार, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, तालुका क्रीडा अधिकारी गाडवे सर आनंद जोंधळे, रविकुमार बकवाड, आदिने अभिनंदन केले. वरील खेळाडूंना रविकुमार बकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. व सोलापूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वरील खेळाडूंची निवड झाली व लातूर विभगचे प्रतिनिधित्व करतील.