जिला

हिमायतनगर येथे भारत राष्ट्र समितीचे नेते चाभरेकर यांना मराठा आंदोलकाचा घेराव.; त्यांच्या चार चाकी वाहणाचे किरकोळ नुकसान

हिमायतनगर, अनिल मादासवार ।राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता गाव पातळीवर येऊन पोहचला असून जवळपास सर्वच ग्रामीण खेडे, शहरात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आंदोलनाची धग कायम असतानाच भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते गंगाधर पाटील चाभरेकर हे हिमायतनगर शहरातून जात असतांना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. आंदोलकांनी चाभरेकर यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. या मध्ये गाडीच्या बायनाट वर दगड लागल्याने किरकोळ गाडीचे नुकसान झाले असून पुढील अनर्थ टळला. या घटनेतून मार्ग काढीत चाभरेकर भितीदायक वातावरणात शहरा बाहेर पडले.

ता. २७ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान भारत राष्ट्र समितीचे नेते गंगाधर पाटील चाभरेकर हे हिमायतनगर शहरातील काही ठिकाणी सांत्वनपर भेटी देण्यासाठी आले होते, असे सांगण्यात आले. शहरातील चौपाटी भागात मराठा आंदोलकांनी चाभरेकर यांच्या गाडीला घेराव घातला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अश्या घोषणा देत आंदोलकांनी गाडीच्या बायनटवर दगड मारला. या मध्ये गाडीचे किरकोळ नुकसान झाले. शहरातील शांतता प्रिय नागरिकांनी परिस्थिती हाताबाहेर जावू न देता चाभरेकर यांची गाडी आंदोलकांच्या गराड्यातून बाहेर काढली. सध्या शहरात शांतता असून आंदोलन चालू आहे. अंतरवली, सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हिमायतनगर शहरांसह गावा गावात मराठा समाज आंदोलन करीत असून राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button