मराठवाडा

भाजप आमदार प्रशांत बंब यांचं संपर्क कार्यालय फोडलं, मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारला त्यांनी २४ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. आज सकाळी बीड जिल्ह्यातील माजलगावमधील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावण्यात आली. त्याच सोबत माजलगाव नगरपालिकेचं कार्यालय देखील पेटवून देण्यात आलं. बीडमधील घटनेप्रमाणं छत्रपती संभाजीनगरच्या माजलगावमध्ये देखील आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. आक्रमक आंदोलकांनी भाजप आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर शहरातील संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले.

मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलन आक्रमक झाले असून गंगापूर खुलताबाद मतदार संघाची भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांची गंगापूर शहरातील संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. गंगापूर खुलताबाद मतदार संघाची भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांकडून फोडण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलं आहे. सरकार मराठा आरक्षणासंबंधी कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याने आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. पण, सरकारला त्याचं काही देणं-घेणं नाही असं वाटतंय. त्यामुळं आता येथून पुढं आमदार असो की मुख्यमंत्री प्रत्येकालाच मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. तसंच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मराठा समाजाचं आंदोलन अजून तीव्र होईल, असा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आलाय.
दरम्यान, राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक होत असताना राज्य सरकार देखील सतर्क झालेलं आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील आणि नाशिक मधील निवासस्थानाचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा लोकसभा सचिवालयानं स्वीकारला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button