भूखंड माफियावर कार्यवाही करण्याचे तहसीलदारांना आदेश
नांदेड दि.27 शहरातील बाफना टी पॉईंट जवळी मोक्याच्या ठिकाणच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या दीपलक्ष्मी डेव्हलपर्स विरुद्ध चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करावी असे आदेश नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर उपजिल्हाधिकारी सामन्य यांनी तहसीलदार नांदेड यांना दिले आहेत.
नांदेड येथील अनेक भूखंड माफी यांनी मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून शहरात हैदोस माजवला आहे याचीच एक कडी म्हणजे बाफना टीम पॉईंट जवळील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एका मोठ्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे या विरोधात
नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सरदार मनजितसिंघ जगनसिंघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक 7345/23 दाखल केली होती. त्यांच्या मागणीनुसार सर्व्हे नंबर 5, 7, 8, 23, 68, 69, 16, 13, 21, 25, 27, 35, 86 आणि 96 हे मुळ शासनाच्या मालकीचे आहेत. या सर्व जमीनीचा महसूल गोळा करण्यासाठी पट्टेदार या सदराखाली ही जमीनी गुरुद्वारा बोर्डाला देण्यात आली आहे. परंतू काही भुखंड माफियांनी शासनाच्या नियमांमधील त्रुटींचा फायदा घेत या मोठ्या भुखंडाचे श्रीखंड खाण्याचा प्रयत्न केला आणि तेथे सर्व जमीनीला टीनशेड लावून ही जागा दिपलक्ष्मी डेव्हलपर्स यांच्या ताब्यात आहे आणि ती सबलिज आधारे आहे असे एक बोर्ड लावून त्यावर लिहिले आहे.
उच्च न्यायालयातील याचिका या आदेशासह परत झाली की, संबंधीत सक्षम अधिकाऱ्याकडे यासाठी दाद मागावी. त्यानंतर मनजितसिंघ जगनसिंघ यांनी नादेड जिल्हाधिकारी कार्यालयात 17 जुलै 2023 रोजी पत्र देवून अतिक्रमण धारकाविरुध्द कार्यवाहीच मागणी केली. त्या पत्राच्या आधारावर तहसीलदार नांदेड यांना 20 ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार सर्व मुळ कागदपत्रांचे अवलोकन करून अभिलेखाची तपासणी करावी आणि आजच्या अतिक्रमण धारकांवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 च्या कलम 53 नुसार चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी. असा आदेश उपजिल्हाधिकारी साहेबांनी नांदेड तहसीलदारांना दिला आहे आता यावर काय कारवाही होते याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे