३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नांदेडची सुवर्ण कन्या सृष्टी पाटील जोगदंडसह महाराष्ट्राचा धनुर्वीधा संघ गोव्याला विमानाने रवाना
भारत सरकारच्या अंतर्गत भारतीय ऑलिम्पिक संघ, गोवा सरकार व गोवा ओलंपिक असोसिएशनच्या वतीने आयोजित 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी नांदेडची धनुर्वीद्या खेळाची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय खेळाडू सृष्टी बालाजी पाटील जोगदंड नुकतेच महाराष्ट्र संघासह नागपूर येथून विमानाने गोव्याकडे रवाना झाली . त्यांना महाराष्ट्र धनुर्वीद्या संघटनेचे अध्यक्ष अॅड प्रशांत देशपांडे , क्रीडा उपसंचालक विजय संतांन यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या . अगदी वयाच्या चार वर्षापासून प्रशिक्षिका तथा आई वृषाली पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडमध्ये धनुर्विद्या खेळाचे प्रशिक्षण घेतलेली सृष्टी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी मराठवाड्यातील एकमेव खेळाडू असून केवळ धनुर्विद्या खेळातच करिअर करायचे या ध्येयाने पछाडलेली सृष्टी कै . धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विजय कुलकर्णी उप प्राचार्य प्राध्यापक संजय आवदाने क्रीडा संचालक डॉ . दिलीप भडके यांनी सन्मान करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सृष्टी पाटील जोगदंड सह महाराष्ट्र संघात मंजिरी आलोने, नक्षत्रा खोडे , पार्थ साळुंखे यशदीप भोगे ,सुखमणी बाबरेकर ,गौरव लांबे यांची निवड झाली असून त्यांचे डॉ . हंसराज वैद्य श्रीनिवास भुसेवार , मुन्ना पाटील कदम कोंडेकर क्रीडा अधिकारी संजय बेतेवार ,प्रकाश होनवडस्कर ,बालाजी शिरशीकर , संजय चव्हाण ,कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर ,शिवाजी पुजरवाड , मालोजी कांबळे ,राष्ट्रपाल नरवाडे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ . मनोज रेड्डी माजी क्रीडा संचालक डॉ . विठ्ठल सिंह परिहार गंगा लाल यादव , किशोर नरवाडे ,किशोर पाठक ज्ञानोबा नागरगोजे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .