क्राईम
पो.स्टे. भाग्यनगर व शिवाजीनगर हद्दीतील घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस एक आरोपी अटक
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलीस निरीक्षक, श्री व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने माली गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी यांना नांदेड शहरात घरफोडी केलेला आरोपी नामे राजू ऊर्फ कॅली हा तेहरा नगर, नांदेड येथे आल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर इसमाचा शोध घेवून गुन्हयातील इसम नामे राजू ऊर्फ कॅली अशोक वाघमारे, वय 25 वर्ष, व्यवसाय मजूरी, रा. तेहरानगर, नांदेड यास ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
1) पो. स्टे. भाग्यनगर गुरनं 299/2023, कलम 454,457,380 भादंवि
2) पो.स्टे. भाग्यनगर गुरनं 300/2023 कलम 454,457, 380 भा.दं.वि.
3) पो.स्टे. शिवाजीनगर गुरनं 153/2023 कलम 457, 380 भादंवि
सदर आरोपीकडून वरील गुन्हयातील मुद्देमाल तीन तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक अॅपल कंपनीचा IPad, एक Samsung कंपनीचा टॅब व दोन हार्डडीस्क असा एकूण 2,63,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. भाग्यनगर येथे देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि श्री रवि वाहुळे, सपोनि पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ / गुंडेराव करले, पोहेकॉ / अफजल पठाण, पोहेकॉ / शेख मोहसीन, पोहेकॉ / संग्राम केंद्रे, पोहेकॉ / बालाजी तेलंग, पोहेकॉ / हनमंत पोदार, पोहेकॉ / विष्णुकांत इंगळे, पोहेकॉ / रुपेश दासरवार, पोना / दिपक पवार, पोना/ संजीव जिंकलवाड, पोकॉ विलास कदम, पोकों/ तानाजी येळगे, पोकों/गजानन वयनवाड, पोकों / रणधिरसिंह राजबन्सी, पोकों/बालाजी यादगिरवाड, पोकों/बजरंग बोडके, पोकॉ/ धम्मा जाधव, पोकों/मोतीराम पवार, पोकॉ/ ज्वालासिंघ बावरी, पोकों / मारोती मोरे, सायबर सेलचे पोहेकॉ / दिपक ओढणे व पोहेकॉ / राजू सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.