मराठवाडा
परभणी येथे पत्रकारास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी
परभणी : (जिल्हा प्रतिनिधी) शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील डॉ. आंबेडकर नगर जिंतूर रोड परभणी येथील रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृहाच्या जागेवर दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने बांधकाम करण्याची कुठलीही परवानगी नसताना सब्बमित सुधाकर सावंत,रा. जिंतूर रोड परभणी, गौतम झुंजारे रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, आवेशभई रा. काद्राबाद प्लॉट परभणी व इतर हे छुप्या पद्धतीने अनधिकृत बांधकाम करत असल्याची माहिती समाजहित न्यूज चे संपादक प्रमोद अंभोरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पत्रकार प्रमोद अंभोरे हे घटनास्थळी जाऊन संबंधित आरोपीनां बांधकाम संदर्भात महानगरपालिकेची परवानगी घेतली आहे का जर घेतली असेल तर ती दाखवा असे पत्रकार प्रमोद अंभोरे यांनी प्रश्न केला असता तेंव्हा सब्बमित सुधाकर सावंत, गौतम झुंजारे, आवेशभई यांनी तू कोण दोन कवडीचा पत्रकार, तूझ्या सारखे खूप पाहिलेत आम्हाला कोणाच्या परवानगीची आवशकता नाही. महानगरपालिका चे सर्व अधिकारी आमच्या सोबतचे आहेत, पुन्हा जर परत येऊन तू माहिती घेण्याचा आणि याची बातमी केल्यावर तुला आणि तूझ्या कुटुंबियांना खतम करून टाकीन अशी पत्रकार प्रमोद अंभोरे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरील जमिनीचा वाद हा परभणी मा. न्यायालयात प्रलंबित असून मा.न्यायाल्याने परभणी महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम काढून टाकण्या संदर्भात अधिकार व संमती दिले आहे. तरी सुद्धा महानगरपालिका त्यांच्या विरुद्ध कुठल्याच प्रकारची कारवाई न करता बघ्याची भूमिका घेऊन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपी सब्बमित सावंत, गौतम झुंजारे, आवेशभई यांनी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त आवेश हाश्मी, बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत दापकेकर, इंजिनिअर संतोष लोंढे स्वच्छता निरीक्षक न्यायरत्न घुगे यांच्याशी हात मिळवणी करून संगणमत रुपये पैसे देऊन सदरील अनधिकृत बांधकाम करू देत असल्याची शंका व्यक्य होत असल्याचा गंभीर आरोप पत्रकार प्रमोद अंभोरे यांनी केला आहे. कारण हे सर्व प्रकरण संबधी महानगरपालिका परभणी यांना माहिती असून सुद्धा बघ्याची भूमिका घेत आहे. सदरील प्रकरणात पत्रकार प्रमोद अंभोरे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर सब्बमित सावंत, गौतम झुंजारे, आवेशभई यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन परभणी येथे भारतीय दंड संहिता 1960 कलम 504, 506, 34 नुसार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 09:45 वाजेच्या सुमारास एन. सी. आर. गुन्हा नोंद करण्यात आला आहे.