क्राईम

मोबाईल खेचून माहिम खाडीत उडी, ४ दिवस शोधाशोध; चोरट्यासोबत भयंकर प्रकार, १५ किमी अंतरावर…

मुंबई: मोबाईल चोरुन पळताना माहिमच्या खाडीत उडी मारलेल्या चोरट्याचा मृतदेह कफ परेड परिसरात आढळून आला. २३ वर्षीय दानिश मुस्तकिन अन्सारीनं शुक्रवारी माहिमच्या खाडीत उडी मारली होती. त्याचा मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा सापडला. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपासासाठी ही केस वांद्रे पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आली आहे.

१३ ऑक्टोबरला अन्सारी मोबाईल खेचून पळाला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्यानं माहिम खाडीत उडी मारली होती. तो बुडाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. अन्सारीचा मृतदेह वाहत १५ किलोमीटर दूरवर असलेल्या कफ परेडला गेला. माहिम-सायन लिंक रोडच्या शेजारी असलेल्या नयानगरमध्ये अन्सारी वास्तव्यास होता. वांद्रे पोलिसांनी मोबाईल चोरीचा तपास सुरू केला. वांद्रे सिग्नलवर असलेल्या सीसीटीव्हींचा आधार पोलिसांनी घेतला. अन्सारीला उत्तम पोहता येत असल्याचं चौकशीतून समोर आलं. मोबाईल खेचून चोरी केल्या प्रकरणी त्याला २०१६ आणि २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती.

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास एका २० वर्षीय कॉलेज विद्यार्थ्याचा मोबाईल खेचून अन्सारी पळाला. विद्यार्थ्यानं पाठलाग सुरू केल्यानं आसपासच्या लोकांचं लक्ष वेधलं गेलं. पकडले जाण्याच्या भीतीनं अन्सारीनं मोबाईल माहिम खाडीच्या बाजूला असलेल्या भिंतीमागे फेकला. त्यानंतर त्यानं माहिम कॉजवे पुलावरुन खाडीत उडी मारली.

पुलाच्या एका बाजूपासून त्यानं दुसऱ्या बाजूला पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी प्रवाहाचा वेग जास्त होता. अन्सारी या प्रवाहाचा बळी ठरला. याची माहिती स्थानिकानं वांद्रे पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्मिशमन दलाची मदत घेतली. पण अन्सारीचा पत्ता लागता नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात एक जण पळताना दिसला. पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याचा जबाब नोंदवला. त्यानं फुटेजमधील अन्सारीला ओळखलं. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला.

दानिश अन्सारी माहिमच्या खाडीत मरण पावला. त्याचा मृतदेह वाहत वाहत कफ परेडला आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर तो त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मराठेंनी दिली. माहिम खाडीची खोली २० ते २५ फूट इतकी आहे. भरतीच्या वेळी खोली ३० ते ३५ फूट होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button