महाराष्ट्रा

‘आत्ता सॉरी म्हण…’ मुकेश अंबानींनी मुलाला फटकारले, वॉचमनची माफी मागायला सांगितलं, जाणून घ्या तो किस्सा

मुंबई : मुकेश अंबानी आणि कुटुंब निश्चितच आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहेत. तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल की, लोक जितके जास्त श्रीमंत तितका त्यांना अभिमान जास्त असतो. तथापि, मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लागू पडत नाही. याचे कारण म्हणजे की देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही त्यांना ना अभिमान आहे किंवा इतरांना त्रास होईल असे काही करताना दिसले नाही. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात.

बक्कळ संपत्ती आणि सर्व ऐशोआराम असूनही मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी आपली तिन्ही मुले – इशा, आकाश आणि अनंत अंबानी- यांनाही तेच संस्कार दिले जे त्यांना मिळाले. हेच कारण आहे की आलिशान आयुष्य आणि भरपूर नोकर असूनही मुकेश अंबानी अगदी साधे जीवन जगतात. सामान्य कुटुंबांप्रमाणेच अंबानी कुटुंबातही मुलांकडून चुका झाल्यास काही नियम बनवले गेले आहेत.

आकाश अंबानीच्या वागण्यावर मुकेश अंबानी झालेले नाराज
अनेक वर्षांपूर्वी मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता सिमी ग्रेवालच्या ‘Rendezvous with Simi Garewal’ शो मध्ये एकत्र आले होते. यादरम्यान, आपल्या कौटुंबिक मूल्यांबद्दल बोलताना जोडपे म्हणाले होते, “मी कधीही कोणाशीही चुकीचे न बोलण्याचा प्रयत्न करतो. तसेच मी माझा राग कोणाला दाखवत नाही. असे काही घडले तरी मी कधीही माफी मागायला मागेपुढे पाहत नाही.”

यावर नीता अंबानी लगेच म्हणतात की याच कारणामुळे मुकेश यांनी आकाश अंबानीला वॉचमनची माफी मागायला सांगितली होती. आपले म्हणणे पुढे चालू ठेवत नीता अंबानी म्हणाल्या, “आकाश एके दिवशी वॉचमनशी फोनवर बोलत होता. यादरम्यान त्याने आपला आवाज वाढवला, जे लांबून मुकेश पाहत होते. आकाशने फोन ठेवताच मुकेश अंबानींनी मुलाला वॉचमनची माफी मागायला सांगितली.”

आकाशला वॉचमनची माफी मागायला सांगितली
आपल्या मुलाला वॉचमनशी मोठ्या आवाजात बोलताना मुकेश यांना आवडले नाही. मुकेश यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहतात, त्यामुळे आपल्या मुलांकडूनही त्यांना अशीच आस होती. याच कारणामुळे मुकेश अंबानी नेहमी आपल्या मुलांना पैशाचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न करतात. पैसे कमावण्यासाठी किती कष्ट करावे लागते, याची त्यांना जण असली पाहिजे. मुलांनी संपत्ती किंवा पदाचा अभिमान बाळगणे चांगले नाही म्हणून त्यांना नेहमी सभ्य वागायला शिकवतात.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button