26 व्या दीक्षांत समारंभात बाबासाहेब भुक्तरे यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान
नांदेड दि.२५ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रा.डाॅ. बाबासाहेब भुक्तरे यांना विद्यावाचस्पती पदवी(Ph.D.) प्रदान करण्यात आली.
यावेळी दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,विशेषअतिथी श्री.बी.सरवनण,व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण,डॉ.सुर्यकांत जोगदंड,डॉ.डी.एम.मोरे, नारायण चौधरी,डॉ.
संतराम मुंढे,कुलसचिव डॉ.
सर्जेराव शिंदे,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके, प्र.वित्त व लेखाधिकारी डॉ.श्रीकांत अंधारे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.महामहीम राज्यपाल श्री.रमेश बैस यांनी आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले.
या दीक्षांत समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून भारत सरकारच्या अनुखनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय अणुउर्जा विभागाचे उत्कृष्ट शास्त्रज्ञ तथा संचालक श्री. बी.सरवणन हे होते.
प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्तरे यांनी मार्गदर्शक डॉ.सुरेश गजभारे आणि डॉ.विजय तरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रशासन विषय अंतर्गत “तुरुंग प्रशासनाचा अभ्यास: विशेष संदर्भ मराठवाडा विभाग” या शीर्षकाखाली संशोधन कार्य केले. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे अशोक सूर्यवंशी,सुरेश थोरात,बाबाराव सावंत, आनंदराव सावते,संजय लोकडे,संपादक मुन्नवर खान, तुकाराम भुक्तरे,भीमराव भुक्तरे, अविनाश कोलते,राहुल भुक्तरे, गजानन भुक्तरे, विजय भुक्तरे,संतोष भुक्तरे, हर्षवर्धन भुक्तरे,सुरज सरपाते, राजू वायवळे, विठ्ठल कांबळे,अभिनंदन इंगोले, प्रदीप वाठोरे, संदीप वाठोरे, बळीराम गायकवाड, बबनराव पोहरे, संभाजी बिराडे,गोपीनाथ पाटील,बुद्धरत्न गोवंदे,संजय आळणे, मोईनुद्दीन अंसारी आदींनी अभिनंदन केले आहे.