महाराष्ट्रा
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव श्री सुमित भांगे यांच्यासोबत बैठक
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव श्री सुमित भांगे यांच्यासोबत दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात आली, या बैठकीत सतीश सुपे उपसचिव, महेश जाधव कक्ष अधिकारी, आशिष आत्राम, कक्ष अधिकारी, अस्मिता पाटील कक्ष अधिकारी, डॉ.अरविंद नरसीकर, विशेष कार्य अधिकारी उपस्थित होते,या अधिकाऱ्यांसोबत शासनाच्या नियमाने जो विभाग ज्या अधिकाऱ्यांकडे असेल त्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रातील दुकानदारांच्या अडचणी मार्गी लावण्यात यावा, अशी विनंती केल्याने आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या तात्काळ मार्गी लावण्यात येतील असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले.
रास्त भाव धान्य दुकानदारांच्या प्रमुख मागण्या
1) epos मशीन कालबाह्य झाल्याने त्या तात्काळ बदलून देण्यात याव्यात तसेच प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि सुटे भाग तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात यावे.
2) रास्त भाव धान्य दुकानदारांचे प्रलंबित कमिशन मार्जिन ची रक्कम नियमित महिन्याच्या महिन्याला अदा करण्यात यावी.
3)संपूर्ण राज्यात वेळेवर धान्य देण्यात यावे
4)आनंदाचा शिधासंचामध्ये शिधाजिन्नस कमी प्रमाणात आढळून आल्याचे शासनास निदर्शनास आणून देण्यात आले असून राज्य शासनाने रास्त भाव दुकानदारांना तात्काळ पैसे देण्यात यावे असा आदेश 14/9/ 2023 रोजी काढलेला आहे तरीदेखील महाराष्ट्रातील काही जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय,अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय हे वेळेवर रक्कम अदा करीत नसल्याने रास्त भाव दुकानदाराचा उदरनिर्वाह कसा चालेल याबाबत शासनाला विचारणा करण्यात आली याबाबत शासन स्तरावर मंत्रालयांमध्ये खेद व्यक्त करण्यात आला व संघटनेच्या वतीने देखील नाराजी व्यक्त करण्यात आली. तरी महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांना कळविण्यात येते की एक महिन्यात नवीन मशीन न मिळाल्यास सर्व मशीन प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात येतील व यापुढे वेळेवर कमिशन मार्जिन ची रक्कम न मिळाल्यास याबाबत शासनास सूचना देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील दुकानदार आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. पुढील आठवड्यापर्यंत प्रश्न न सुटल्यास पुन्हा मंत्रालयात जाऊन हे सर्व प्रश्न संघटनेच्या वतीने मार्गी लावण्यात येतील असा इशारा फेडरेशन च्या वतीने देण्यात आला.
आनंदाचा शिधासंच महाराष्ट्रातील दुकानदारांनी समाधानकारक वाटप केल्याने शासनाच्या वतीने प्रधान सचिव श्री सुमित भांगे, महेश जाधव कक्ष अधिकारी व डॉ.अरविंद नरसीकर विशेष कार्य अधिकारी पुरवठा विभाग यांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीस गणपतराव डोळसे पाटील प्रदेशाध्यक्ष,बाबुराव म्हमाने,जनरल सेक्रटरी, निवृत्ती कापसे, उपाध्यक्ष अशोकराव एडके,विभागीय अध्यक्ष, शाहुराज गायकवाड, सहसचिव, हरीश गुप्ता, अरुण बागडे, मो.इम्रान, उपस्थित होते.