लातूरची सून IAS टीना दाबी याची बहिणीचीही कमाल!
दरवर्षी सुमारे 10 लाख उमेदवार 1000 पेक्षा कमी पदांसाठी अर्ज करतात. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार अतिशय सक्षम आणि भाग्यवान आहेत. लातूरच्या सून टीना दाबी यांनी या परिक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या सध्या राजस्थानमध्ये कार्यरत आहेत.
मात्र, लातूरच्या आयएएस सून टीना दाबी यांच्या बहीण रिया दाबी यांनीसुद्धा या कठीण परिक्षेत आयएएस पदाला गवसणी घातली आहे. भारतात ज्या काही आयएएस अधिकारी चर्चेत असतात, त्यांपैकी एक म्हणजे टीना दाबी. टीना दाबी सोशल मीडियावरदेखील खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या लहाण बहीण रिया दाबी यांनी 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा पहिल्यांदा दिली होती आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 15 वी रँक प्राप्त करत आयएएस पदाला गवसणी घातली.
शालेय जीवनापासूनच रिया दाबीला आयएएस व्हायचे होते. रिया दाबीने यांचे शालेय शिक्षण दिल्लीच्या जीसस अँड मेरी स्कूलमधून झाले आहे. 12वीनंतर रियाने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी घेतली. येथून त्यांनी राज्यशास्त्रात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
रियाला अभ्यासासोबतच इतर अनेक गोष्टींमध्येही रस आहे. अभ्यासानंतर उरलेल्या वेळेत त्या चित्रकला करायची. चित्रकला हा त्यांचा लहानपणापासूनचा छंद. याशिवाय त्यांना भारतीय लोककलांमध्येही रस आहे.