क्राईम

माजी सैनिक संघटने कडून सैनिक मारोती जायभाये यांचा जाहीर निषेध

मुदखेड ता. (मोहम्मद हकीम) तालुका कंधार गाव बोरी खुर्द येथील सेवारत सैनिक मारोती जायभाये यांनी दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या आठ महीण्याच्या गरोदर पत्नी व तीन वर्षांच्या मुलीचा झोपे मध्येच गळा दाबुन खुन केला. वरील सैनिक मारोती जायभाये यांनी सैनिक सेवेला काळीमा फासणारी थरारक घटनेबद्दल संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्या घटनेचा नांदेड जिल्हा मधील सर्व माजी सैनिक संघटने कडून जाहीर निषेध व्यक्त केला व मयत सैनिक पत्नी च्या आई व वडिलांची सांत्वना करण्यासाठी व त्यांना सैनिक ऑफीस मध्ये कसल्याही प्रकारची अडचन आल्यास मयत मुलींच्या आई वडील यांना धीर देऊन सर्व सेवारत व सेवानिवृत सैनिक आपनास सहकार्य करतील असे तालुका.

 

 

कंधार गाव पळसवाडी येथे सैनिक फेडरेशन चे मराठवाडा अध्यक्ष तथा मुदखेड नगरपरीषद चे मा. उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे तसेच मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमीचे प्रमुख तथा सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, अर्जुन कांबळे, पी व्ही वाघमारे, संभाजी कल्याणकर, राजू पवार, मारोती गिनेवाड या सहित संघटनेच्या शिष्ट मंडळांनी मयत मुलीच्या आई वडील यांची सांतवना करून आम्ही आपल्या दुःखात जिल्ह्यातील सर्व सेवारत व सेवानिवृत सैनिक सामील आहोत. सैनिक असो या इतर कोणीही असो अशा गलतीला माफी नाही. यापूर्वी आम्ही सैनिकावर होणाऱ्या अन्याया विरोधात पाठपुरावा केला. पण आज सैनिक अशा प्रकारची कृती करून समाज व सैनिकी सेवेला काळिमा फासणाऱ्या सैनिकाला धडा शिकवण्यासाठी व यापुढे कोणत्याही सैनिकांची हिम्मत होनार नाही आणि संबंधीत सैनिक मारोती जायभाये यास लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आमच्या संघटना कडून जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू. आम्ही सर्व संघटना आपल्या सोबत आहोत. अशी भावना लक्ष्मण देवदे, ज्ञानेश्वर पाटील डुमणे, बालाजी चुकलवाड यांनी जड अंतकरणाने व्यक्त केली…

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button