क्राईम
एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुससह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
अवैद्य शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे टिमला आदेश दिले होते..
दिनांक 12/09/2023 रोजी स्था. गु. शा. नांदेड चे पो उप नि श्री दशरथ आडे यांना नांदेड शहरातील आंबेडकरनगर पाटीजवळ, नांदेड येथे एक इसम स्वत:चे जवळ पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी सदर माहीती वरीष्ठांना देवुन वरीष्ठांचे आदेशाने त्यांचे सोबत अमंलदार यांना घेवुन आंबेडकरनगर पाटीजवळ, नांदेड येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे 1) अक्षय नामदेव वाघमारे वय 23 वर्ष रा. बौध्दविहारजवळ आंबेडकरनगर, नांदेड यास पकडुन त्यांची झडती घेतली असता, त्याचे कमरेला लावलेले एक गावटी बनावटीचे पिस्टल किंमती 25,000/- रुपयाचे व एक जिवंत काडतुस किंमती 2000/- रुपयाचे मिळुन आले. नमुद आरोपीने सदरचे पिस्टल 2 ) निहाल अनिल अटकोरे वय 24 वर्ष रा आंबेडकरनगर, नांदेड यांचेकडुन विकत घेतल्याचे सांगीतले. सदरचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले असुन नमुद दोन्ही आरोपीविरुध्द पो उप नि दशरथ आडे यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, पोउपनि / दशरथ आडे, पोना/ किशन मुळे, पोकॉ/राजीव बोधगिरे, इसराईल शेख, साहेबराव कदम, अनिल बिरादार, श्रीराम दासरे, अकवर पठाण यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.