क्राईम
नांदेड जिल्हात घरफोडया करणाऱ्या आरोपीस 6,78,000/- रुपयाचे मुद्देमालासह अटक, चार गुन्हे उघड
मागील काही दिवसा पासुन नांदेड जिल्हात परफोडय चे प्रमण वाडल्या मुळे मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस • अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना घरफोड्या करणाऱ्या आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते.
दिनांक 10/09/2023 रोजी स्था.गु.शा चे पथकातील अधिकारी यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नांदेड जिल्हयात घरफोडी करणारा आरोपी हा विलोली टोल नाक्याजवळ येणार अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्था.गु.शा चे पथकाने बिलोली टोल नाका येथे जावुन सापळा रचुन आरोपी नामे अमरिश उर्फ आमय पि.दुर्जा काळे वय 45 वर्षे रा.जेउर ता.अकलकोट जि. सोलापुर ह.मु. दगडपुरता. बिलोली जि.नांदेड यास पकडुन विचारपुस करता त्यांनी, 1) पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 568 / 2022 कलम 454,457, 380 भा.द.वि 2) पोलीस ठाणे उस्माननगर गुरनं. 74/2023 कलम 457,380 भा. द. वि. 3) पोलीस ठाणे मुखेड गुरनं. 53 / 2023 कलम 457,380 भा. द. वि. व पोलीस ठाणे नायगाव गुरनं. 125/2022 कलम 457, 380 भा. द. वि. हे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. नमुद आरोपीकडुन घरफोडीतील चोरी केलेले 113 ग्राम दागिने किंमती एकुण 6,78,000/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीहा सोलापुर जिल्हयातील खुन व दरोडयात फरार आहे. नमुद आरोपीस पो. स्टे. नांदेड ग्रामीण येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर पोलीस निरीक्षक श्री व्दारकादास चिखलीकर, स्थागूशा नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि / रवी वाहुळे, सपोनि / पांडुरंग माने पोउपनि / सचिन सोनवणे, पोहेकॉ / गुंडेराव करले, पोना / संजिव जिंकलवाड, पोकों / देवा चव्हाण, पोकों/ बालाजी यादरगीरवाड , पोकों / ज्वालासिंग बावरी, पोकॉ/ रणधीर राजबन्सी, पोकॉ/ गजानन बयनवाड व चापोकॉ / शंकर केद्रे, घुगे, मुंढे , बिचकेवार, ठाकुर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.