स्पोर्ट्स

कै.वसंतराव काळे वरीष्ठ महाविद्यालयाचा फुटबॉल संघ उपविजेता

 

सगरोळी दि.7 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत सी. झोन मध्ये खेळवण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला आहे. सगरोळी येथील उत्कर्ष व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज सगरोळी द्वारे आयोजित या फुटबॉल स्पर्धेत सी.झोन मधील एकूण पाच संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामना गुरुगोविंद सिंघ अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड व कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड यांच्यात झाला अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात 5/4 असा निसटता पराभव होऊन कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय उपविजेता ठरला.या संघास क्रीडा संचालक प्रभारी प्राचार्य डॉ. उस्मान गणी यांनी मार्गदर्शन केले.

 

संघाचा कर्णधार शेख साद अमिन शेख बिलाल अमिन होता. संघातील इतर खेळाडूत मोहम्मद ईरशाद,मो.फैजान खान मो.रहमत खान,शेख कैफ शेख अख्तर,शाजेब खान,सय्यद अदनान,सलमान खान शुकूर खान,मोहम्मद फैजान,कुरेशी अराफात,उमर फारुखी, सय्यद रेहान,सय्यद शम्स, मोहम्मद जुनेद,शेख शारेख, शेख अल्ताफ यांचा समावेश होता. यावेळी सी झोन फुटबॉल निवड समिती अध्यक्ष डॉ.विक्रम कुंटूरवार व सदस्य. डॉ उस्मान गणि यांनी निरीक्षण केले तर स्पर्धेचे उद्घाटन सी झोनचे सचिव प्रा. डाॅ महेश वाखरडकर यांच्या हस्ते झाले आणि क्रीडा शिक्षक मोहम्मद अथरोद्दीन कुरेशी यांनी पंच प्रमुखांचे विशेष कार्य केले सी.झोन स्तरावर फुटबॉल संघाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोहम्मद मझरोद्दीन,सचिव प्रा.अर्जुमंदबानो यास्मिन, प्रा. डाॅ.स्मिता कोंडेवार,प्रा.पुष्पा क्षीरसागर,प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्‍तरे,प्रा.मो.इस्माईल, प्रा.रिजवान बागवान,प्रा.शेख नजीर,प्रा.मो.दानिश,प्रा. फर्जाना बेगम,प्रा.नुरी बेगम, प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.डॉ. सय्यद वाजिद,प्रा.निजाम.मो.मोहसिन यांनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button