मराठवाडा
ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापनदिनी परभणी काँग्रेसची पदयात्रा व वतीने निषेध मोर्चाचे आयोजन
परभणी -परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मा. आ. सुरेश वरपुडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सुरेश वरपुडकर बोलतांना म्हणाले की नेते मा. खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमिटरची भारत जोडो यात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबर २०२३ रोजी एक वर्ष होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर सर्व जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा काढून पहिला वर्धापन दिन साजरा करणार आहे.
या मध्ये परभणी जिल्हा व काँग्रेस कमिटीची पदयात्रा व निषेध मोर्चा दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता काँग्रेस कमिटी शनिवार बाजार येथून ते छत्रपति शिवाजी महाराज पुतळा परिसर पर्यंत निघून समारोप होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने जनतेची कशी लुट केली . २०१४ साली LPG गॅसची किंमत ४५० रुपये होती, ही वाढवून मागील ९ वर्षात ११५० रुपये केली . वन नेशन वन इलेक्शन , इंडिया इज भारत असताना जाणून बुजून इंडिया नावाच्या ठिकाणी भारत करने अशा अनेक प्रकारे संविधानाची पायमल्ली करून नागरिकांना धोका देणे,तसेच आंतरवली सराट या ठिकाणी मराठा समाज लोकावर अमानुष लाठी हल्ला करणे असे जाणून बुजून निर्णय घेतले असे बोलले. तसेचआंतरवली सराट या ठिकाणी मराठा समाज लोकशाही पद्धतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करत होते परंतू त्यांच्यावर अमानुष पणे लाठी हल्ला करण्यात आला या बद्दल शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी निषेध ठराव मांडला व त्यास जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत रामभाऊ घाटगे यांनी अनुमोदन दिले हा निषेधाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पद यात्रेस व मोर्चास मराठा बांधवांनसह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीमध्ये मा.तुकाराम रेंगे पाटिल मा. सुरेशदादा देशमुख, रामभाऊ घाडगे, भगवान दादा वाघमारे, नदीम इनामदार, पंजाब देशमुख, नाना राउत, मालिका गफार, दुराणी खानम मॅडम, आदींनी आपले विचार व्यक्त केले. या बैठकीस बंडू पाचलिंग, खादिर लाला हाश्मी, अतिक उर रहेमान, सुनिल देशमुख, जिंतुर तालुका अध्यक्ष गणेश काजळे, हनुमंत डाके,महिला शहर जिल्हाध्यक्ष दुर्रानी मॅडम,मलेका गफार मॅडम, महापालिका मा. सभापती गुलमिरखान, ता. आ. सोनपेठ धोंडगे सर, सुहास पंडित, अजय चव्हाण, नागसेन भेरजे, सेलु शहराध्यक्ष शेख दिलावर, श्रीकांत पाटील, सचिन जवंजाळ, सत्तार पटेल , शेख मतीन, अमोल जाधव, सुरेश काळे, माजी नगरसेवक तांबोळी, मुंजाभाउ गायकवाड, प्रल्हाद अवचार, निखिल धामणगावे, बाबा अवचार,व्यंकटेश काळे, शिंगणकर मॅडम, जानूबी मॅडम, अभय देशमुख , राजेश रेंगे, दिगंबर खरवडे,आर्जुन वजिर, ,तहेसिन देशमुख, आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठीचे
आभार सुहास पंडित यांनी मानले