क्राईम
परभणी शहरात मुद्देमाल सहित लाखो रुपयांचे दारू जप्त परभणी राज्यशुल्कची कामगिरी
परभणी / राज्यत विनापरवानगीने इतर राज्यात दारू अनेक ग्रॅमचे घेऊन जात असताना परभणी यथे एक सिल्वर कलरची स्विप्ट व्ही. डी. आय. चारचाकी वाहन क्र. MH-20 BC-1764 असा असलेली या चारचाकी वाहनाने अवैध रीत्या विनापरवाना गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मदयसाठ्याची वाहतूक होणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोखर्णी ते पाथरी रोडच्या बाजूस सापळा रचला असता तद्नंतर दि. 06/09/2023 रोजी रात्री 1:30 वाजता पाथरी रोडने एक संशयीत चारचाकी वाहन क्र.MH-20 BC-1764 हे येत असतांना दिसले वाहनास थांबून सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या (मॅगडॉल नं. 1 व्हिस्की, इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग ) 750 मी.ली. क्षमतेच्या एकूण 168 सीलबंद बाटल्या (एकूण 14 बॉक्स), 180 मी.ली. क्षमतेच्या एकूण 288 सीलबंद बाटल्या (एकूण 6 बॉक्स), 180 मी.ली. क्षमतेच्या विदेशी दारू रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या एकूण 1,000 बनावट कॅप तसेच एक चारचाकी वाहन, एक मोबाईल संच आरोपी 1) विश्वजित दयानंद कोमटवार रा. कोटमवार गल्ली, धारूर ता. धारूर जि. बीड यांच्या ताब्यात
चारचाकी वाहनामधून गोवा राज्यात विक्रीस असलेली अवैध विदेशी मद्याची वाहतूक करीत असतांना मिळून आला व आरोपी परमेश्वर बाबासाहेब वावळकर वय-35 वर्ष, धंदा- ड्रायव्हर रा. तेलगाव ता. धारूर जि.बीड हा फरार आहे. आरोपी क्र.1 यास अटक करून ताब्यात घेण्यात आले व त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) 80,83,90 व 108 अन्वये गुन्हा क्र.389/2023 नोंद करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाचे वर्णन वाहनाची अंदाजे किंमत रुपये = 3,00,000/ मुद्देमालाची अंदाजे किंमत रुपये = 1,51,080/एकूण जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत रुपये = 4,51,080/ या कामगीरी मधी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, परभणी /हिंगोली. या कार्यालयाने कार्यवाही केली असून श्री. बी. एस. मंडलवार प्र. निरीक्षक तसेच सर्वश्री जवान आर.ए. चौहान, एस. एस. मोगले व बी. पी . कच्छवे जवान-नि- वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक परभणी/हिंगोली यांनी कार्यवाही पार पाडली पुढील तपास श्री. बी. एस. मंडलवार प्र. निरीक्षक हे करीत आहेत.