क्राईम
अग्नीशस्त्र गावठी पिस्टल, 03 जिवंत काडतुस व एक आरोपीसह मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलीसांनी केला जप्त.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत दिनांक 03/08/2023 रोजी गोपनिय बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, सुनिलनगर, धनेगाव नांदेड येथे साईनाथ अनिल भांडे हा गावटी पिस्टल विक्री करण्याचे उद्देशाने सोबत बाळगत असुन तो सध्या सुनीलनगर येथील त्याचे घरी आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड श्री. अविनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री. खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागाग इतवारा नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः पोनि जगदिश भंडरवार, पोउपनि विजय पाटील, पोउपनि आनंद बिचेवार , पोहेकॉ / 2434 प्रमोद कन्हाळे, पोहेकॉ / 492 संतोष जाधव, पो.ना. 1243 ज्ञानोबा कवटेकर पोका 221 माधव माने, पोका 170 संतोष बेल्लुरोड, मपोहेकॉ / 760 केंद्रे यांचे एक पथक तयार करून खाजगी वाहणाने सुनीलनगर धनेगाव नांदेड येथील साईनाथ अनिल भांडे याचे घरी दोन पंचासह जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला डाव्या बाजुस खोवलेला एक गावटी लोखंडी पिस्टल ( मनाई केलेले अग्नीशस्त्र) व त्यास मॅग्जीन व त्या मॅग्जीन मध्ये तिन जिवंत काडतुस (राऊंड) असलेली पिस्टल मिळुन आली सदर गावटी पिस्टल
वरील प्रमाणे आरोपी साईनाथ अनिल भांडे याचेकडे जप्त करण्यात आलेले अग्नीशस्त्र व 03 जिवंत काडतुस, एक मॅग्जीन असे विनापरवाना मिळुन आल्याने पोउपनि विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे गुरनं 557/2023 कलम 3/257/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि श्री ज्ञानेश्वर मटवाड यांचेकडे देण्यात आला. तपास अधिकारी श्री मटवाड यांनी सदर आरोपीस अटक करून आरोपीस पोलीस कस्टडी मिळणेसाठी दिनांक 04/08/2023 रोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक 06/08/2023 रोजीपावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन सदर आरोपीकडे अधिक तपास सुरू आहे.
सदर उल्लेखनिय कामगीरीबाबत मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड श्री. अविनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री. खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागाग इतवारा यांनी विशेष अभिनंदन केले